Merry De Costa on Smriti Mandhana : गेल्या अनेक दिवसांपासून भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना चर्चेत आहे. स्मृति मांधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छलच्या लग्नाच्या चर्चांना काही दिवसापासून उधाण आल्याचे दिसत आहे. स्मृतिच्या वडिलांना लग्नाच्या दिवशी अचानक हृदयविकारायच्या झटका आल्याने त्यांचे लग्न पुढे ढकळल्याचे स्मृतीने सांगितले होते. परंतु आता तर लग्न पुढे ढकलल्याचे वेगळेच कारण समोर आले आहे.
स्मृती मानधना आणि पलाश मु्च्छलचं लग्न पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नेमके कारण काय यावर चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत होते. सुरुवातीला स्मृतिच्या वडिलांना हृदयविकरचा झटका आल्याने लग्न पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात होते. परंतु त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीसोबत केलेले काही चॅट्स व्हायरल झाले. यावरून पलाशने स्मृतीला धोका दिल्याचे बोलले जाऊ लागले. या सर्वांवर अद्याप देखील स्मृतीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून आता पलशने चॅट केलेल्या तरुणीने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता सध्या व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये ती त्याला कधीच भेटली नसल्याचे तिने सांगितले आहे. परंतु भेट झालेली नसताना देखील पलाशने मेरीला डीएम का केलं? स्मृती मानधनाशी रिलेशनशिपमध्ये असताना तिच्याशी का फ्लर्ट करत होता? असे प्रश्न पलाश वर उपस्थित केले जात आहे.
हे ही वाचा : स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती स्थिर; पलाशनंही घेतले उपचार
काय लिहिले होते या पोस्ट मध्ये
मेरी डिकोस्टा नावाच्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, ती तीच व्यक्ति आहे जीने हे सर्व चॅट पोस्ट केले होते. मला कधीच माझी ओळख उघड करायची नव्हती, परंतु आता मला काही गोष्टी स्पष्ट करायच्या सन जे चॅट्स मी पोस्ट केलेत, ते मे आणि जुलै 2025 महिन्यातील आहे. मी त्याला कधीच भेटले नाही… तसेच, हे मला आत्ताच करायची काय गरज होती? तर मला त्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा होता, तो कोण आहे, हे मला सर्वांना सांगायचं होतं. या पोस्ट मध्ये तिने तिला क्रिकेट आवधते आणि स्मृति मांधाना कहा मी अंदर करते असे लिहिले आहे. आणि त्यामुळेच मला सत्य सर्वांसमोर आणायचं होतं… असे तिने स्पष्ठ सांगितले आहे. तसेच ती म्हणाली की, ज्या मुलीने पलाश ची फसवणूक केली आहे ती मी नाही. असे देखील ती म्हणाली.











