PM Modi unveils tallest Lord Ram statue : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री संस्थान गोकर्ण परगणी जीवोत्तम मठ इथं भगवान रामाच्या 77 फूट कांस्य मूर्तीचं अनावरण केलं. दक्षिण गोव्यातील कानाकोणा येथील श्री संस्थान गोकर्ण परगणी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त, “सारध पंचशतमनोत्सव” साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्याच्या दौऱ्यावर होते. या भेटीदरम्यान, त्यांनी कानकोणा येथील श्री संस्थान गोकर्ण परगणी जीवोत्तम मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त, “सारध पंचशतमनोत्सव” साजरा करण्यासाठी भेट दिली.
खाय नाणंही केलं प्रकाशित :
गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी तयार करणारे प्रसिद्ध नोएडा शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशाल मूर्ती तयार करण्यात आली आहे. अयोध्येतील पुतळ्याप्रमाणेच, पुतळ्याचा चेहरा देखील सौम्यता आणि दिव्यता दर्शवितो. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी केवळ पुतळ्याचं अनावरण केलं नाही तर रामायण थीम पार्क आणि संग्रहालयाची पायाभरणी देखील केली. या खास प्रसंगाचं औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी मठाच्या इतिहासाचं वर्णन करणारे एक विशेष टपाल तिकिट आणि स्मारक नाणं देखील प्रकाशित केलं.
हे ही वाचा : व्लादिमीर पुतिन पुढील महिन्यात दोन दिवसीय भारत दौऱ्यावर; राष्ट्रपती मूर्मू आणि पंतप्रधान मोदींची घेणार भेट
काय म्हणाले पंतप्रधान मोदी :
मठाच्या 550 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही संस्था गेल्या 550 वर्षांपासून समाजाचं मार्गदर्शन करत आहे. काळ बदलला आहे आणि आव्हानं निर्माण झाली आहेत, परंतु सत्य आणि सेवेवर आधारित हा मठ स्थिर राहिला आहे. अशा संस्था समाजाला सहन करण्याची शक्ती देतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी मठात प्रार्थनाही केली. हा मठ सारस्वत ब्राह्मण समुदायाचं एक आदरणीय केंद्र आहे, ज्याच्या देशभरात 33 शाखा आहेत आणि लोकांना नवीन मार्गांवर मार्गदर्शन करत आहे.
#WATCH | Goa | Prime Minister Narendra Modi unveiled a 77-foot statue of Lord Ram made up of bronze at Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math.
The Prime Minister is visiting the math on the occasion of ‘Sardha Panchashatamanotsava’, the 550th-year celebration of the… pic.twitter.com/LgSQEvASbc
— ANI (@ANI) November 28, 2025
अयोध्यासारखे भव्य दृश्य आता गोव्यात :
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितलं की, ज्याप्रमाणे अयोध्येत भव्य मंदिर बांधण्यात आलं, त्याचप्रमाणे गोव्यात जगातील सर्वात उंच राम पुतळा बसवण्यात आला आहे. त्यांनी पर्यटनाच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल असल्याचं म्हटले. स्थानिक आणि तरुणांमध्येही याबाबत प्रचंड उत्साह होता. लोक म्हणाले की गोवा हे बहुतेकदा फक्त पार्टी डेस्टिनेशन मानलं जात असे, परंतु आता जगाला आपल्या संस्कृतीबद्दल देखील माहिती होईल. जे अयोध्येला जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हे ठिकाण आता एक प्रमुख श्रद्धेचं केंद्र बनलं आहे.











