Minister convoy controversy : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतेच देशवासियांना इंधन बचत व कटकसर करण्याचे आवाहन केलं. त्यांतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या ताफ्यातील केवळ दोन गाड्या घेऊन ते आपल्या कार्यालयात गेल्याचा व्हिडीओ देशभर व्हायरल झाला. यामुळे देशात बचितचा संदेश गेला अन् अनेक नेत्यांनी आपल्या सुरक्षेत आणि ताफ्यात बचत केली. पंतप्रधान मोदींचा आदर्श ठेवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadanvis) देखील आज बाईकवर प्रवास केला.
त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आज पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी करताना बसने प्रवास केला. एका बाजूला वरिष्ठ नेते कटकसर करत असताना मंत्री गिरीष महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मात्र कहरच केला. वरिष्ठ नेत्यांनी देशातील आणि राज्यातील जनतेची मिळवलेली सहानुभूमी या दोन्ही नेत्यांनी मातीत मिळवली. त्यानंतर विरोधकांनी देखील तोंडसुख घेयला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी करत इंधन बचतीच्या केलेल्या आवाहनाला कृतीतून संदेश दिल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज एक आगळावेगळा आदर्श समोर ठेवला. फडणवीसांनी नेहमीचा मोठ्या गाड्यांचा ताफा आणि कडक सुरक्षा व्यवस्था बाजूला सारून मुख्यमंत्री आज चक्क बुलेट मोटारसायकलवरून विधानभवनात दाखल झाले.
मुख्यमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत बुलेट एन्ट्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवत होते. तर त्यांच्या पाठीमागच्या सीटवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार स्वार झाले होते. पंतप्रधानांनी देशातील वाढता इंधन वापर कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांना शक्य तिथे इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासकीय स्तरावर आणि सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः दुचाकी चालवून विधानभवन गाठण्याचा निर्णय घेतला.
मंत्री गिरीज महाजन आणि रविंद्र चव्हाणांचा विमान प्रवास
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक कुंभमंत्री नामदार गिरीश महाजन यांचे नाशिक विमानतळावर नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक अमोल दिनकर पाटील यांनी स्वागत केलं. त्यामुळे नेत्यांच्या आवाहनाला मंत्र्यांकडून आणि आमदारांकडून हारताळ फासण्याचं काम करण्यात येत आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.
महाराष्ट्रवासीयांनो बघा, आदरणीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनानंतर कशी छान काटकसर सुरू आहे!
बहुतेक यांची विमाने हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत… ऑक्सिजनवर उडत असतील तर नाशिकची झाडे आधीच कापली असल्याने इंधनाची अडचण होऊ शकते ही बाब मंत्री महोदयांनी विसरू नये!… pic.twitter.com/CUG9AkrQvr
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 14, 2026
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश
मुख्यमंत्री फडणवीसांनी जागतिक ऊर्जा संकट आणि इंधन बजतीच्या पाश्वभूमीवर कालच महत्त्वाचे आदेश दिलेत. ज्यात स्वत: मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आता थेट निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेतला. तसेच मंत्री, अधिकार्यांचे विदेश दौरे रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला.












