Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • संभाजी महाराजांवर प्रेम फक्त जयंती अन् चित्रपटासाठी? औरंग्याची कबर तिथेच
ताज्या बातम्या

संभाजी महाराजांवर प्रेम फक्त जयंती अन् चित्रपटासाठी? औरंग्याची कबर तिथेच

Aurangzeb's Grave Controversy

Aurangzeb’s Grave Controversy : छत्रपती संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) बलिदानाचा इतिहास जेव्हा पडद्यावर किंवा भाषणांमधून येतो, तेव्हाच औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा ऐरणीवर येतोच. छत्रपती संभाजीनगरमधून औरंगजेबची कबर (Aurangzeb’s Tomb) हटवण्याची अनेकदा मागणी होते. मात्र ही मागणी फक्त जेव्हा चित्रपट येतो किंवा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (Sambhaji Maharaj Birth Anniversary) येते तेव्हाच होते का? इतर वेळी छत्रपती संभाजी महाराजांबाबत कुणीही बोलताना का दिसत नाही, असे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता. त्यांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीत सुमारे 120 युद्धे लढली आणि एकही युद्ध हरले नाहीत, असं म्हटलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि औरंगजेबाची कबर यावरून राज्यात वारंवार तणावाचे वातावरण पाहायला मिळतं. विशेषतः जेव्हा संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित एखादा भव्य चित्रपट येतो किंवा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच ‘कबर हटवा’ ही मागणी जोर धरते. इतर वेळी मात्र याच कबरीवर राजकीय नेते नतमस्तक होताना दिसतात, ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण होते.

हेही वाचा – PM मोदींच्या आवाहनानंतर गडकरींचा मोठा निर्णय, बसने करणार पालखी मार्गाची पाहणी, ताफा केला कमी

महाराजांची हत्या आजही अंगावर शहारे आणते

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी सोसलेले हाल हा मराठी मनाचा सर्वात हळवा कोपरा आहे. औरंगजेबाने ज्या क्रूरतेने महाराजांची हत्या केली, तो इतिहास आजही अंगावर शहारे आणतो. जेव्हा एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून हा इतिहास दृश्य स्वरूपात समोर येतो, तेव्हा जनमानसात औरंगजेबाबद्दल तीव्र संताप उसळणे स्वाभाविक असते. मात्र, याच जनभावनेचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जाणीवपूर्वक चर्चेत

गेल्या काही काळात संभाजी महाराजांवर आधारित चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जाणीवपूर्वक चर्चेत आणला गेल्याचे दिसते. चित्रपट निर्मात्यांसाठी ही ‘मोफत प्रसिद्धी’ ठरते, तर राजकीय पक्षांसाठी मतपेढी मजबूत करण्याची संधी असते. मात्र ठराविक वेळीच नेते आणि इतर लोक आक्रमक होताना दिसतात. इतर वेळी ते महाराजांविषयी का बोलत नाहीत. औरंगजेबाची कबर हटवण्यात का येत नाही, असा प्रश्न निर्माण होतंय.

दुटप्पी भूमिका राजकीय नेते कधी थांबणार?

काही नेते छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलताना दिसतात. त्यानंतर दुटप्पी भूमिका घेत त्याच कबरीवर डोकं टेकवताना दिसतात. त्यामुळे जेव्हा हिंदूंची मतं हवी असतात, तेव्हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबाबत बोलताना दिसतात. तर जेव्हा मुस्लिम समाजाची मतं हवी असतात तेव्हा खुलताबादला जाऊन औरंगजेबच्या कबरीवर डोकं टेकवताना दिसतात. हा दुटप्पी भूमिका राजकीय नेते कधी थांबणार असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला घातक मानला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts