Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • यूकेमध्ये अनुपम खेर यांचा डंका! एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा सन्मान
Top News

यूकेमध्ये अनुपम खेर यांचा डंका! एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा सन्मान

Anupam Kher | बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवलं आहे. तर आता अनुपम खेर यांनी बॉलिवूडसोबतच यूकेमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अनुपम खेर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण त्यांना यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (UK Asian Film Festival 2026) मोठा सन्मान मिळाला आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली; नेमकं घडलं काय?

अनुपम खेर यांना कोणत्या चित्रपटासाठी मिळाला आंतरराष्ट्रीय सन्मान?

अनुपम खेर यांनी कॅनेडियन-भारतीय चित्रपट ‘कॅलरीज’मध्ये काम केलं होतं. तर याच चित्रपटातील अभिनयासाठी त्यांनी यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फ्लेम अवॉर्ड जिंकून आपल्या कारकिर्दीत आणखी एक आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा खोचला आहे. कॅलरीज या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक ईशा मारझारिया यांनी केलं आहे. तर हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला असून त्याने यूके एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.

अनुपम खेर यांनी त्यांना गौरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबाबतची एक खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अनुपम खेर यांनी म्हटलं आहे की, कॅलरीज चित्रपटातील माझं पात्र वास्तविक जीवनातील अनुभवांवरून प्रेरित होते, ज्यामुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक आणि भावनिकदृष्ट्या थकवणारी होती. तसेच आपले कौतुक होणे ही नेहमीच एक अद्भुत भावना असते, विशेषतः जेव्हा ते भारताबाहेरून आणि एका आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मिळते, असं अनुपम खेर म्हणाले. सोबतच त्यांनी दिग्दर्शक ईशा मार्झरा आणि निर्माता जो ब्लास यांच्यासह ‘कॅलरीज’च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि या सन्मानाबद्दल महोत्सवाच्या ज्युरींचे आभार मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांच्या या दमदार कामगिरीनंतर त्यांना बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांनी देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, अनुपम खेर हे एक ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते असून त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुपम यांनी आत्तापर्यंत सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. तर सध्या ते ‘जाने पहचाने अनजाने’ या नाटकाद्वारे रंगमंचावर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. गजेंद्र अहिरे यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या या नाटकामध्ये अनुपम खेर आपल्या दिसणार आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts