• Home
  • राशी भविष्य
  • संस्कृती
  • यंदा पहिल्यांदाच वटसावित्री व्रत ठेवणार आहात? अधिक मासामुळे निर्माण झाला संभ्रम; जाणून घ्या काय सांगतात शास्त्र
राशी भविष्य

यंदा पहिल्यांदाच वटसावित्री व्रत ठेवणार आहात? अधिक मासामुळे निर्माण झाला संभ्रम; जाणून घ्या काय सांगतात शास्त्र

Vat Savitri Vrat 2026

Vat Savitri Vrat 2026: यंदा वटसावित्री व्रत १६ मे रोजी ज्येष्ठ अमावस्येला साजरे केले जाणार आहे. यामुळे अनेक नवविवाहित महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. कारण व्रतानंतर लगेचच मलमास (अधिक मास) सुरू होत असल्याने पहिल्यांदा हे व्रत सुरू करणे योग्य ठरेल का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मीडियावरही यासंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत. मात्र धर्मशास्त्रांनुसार या व्रतावर मलमासाचा कोणताही परिणाम होत नाही.

यंदा वटसावित्री व्रत १६ मे रोजी ज्येष्ठ अमावस्येला साजरे केले जाणार आहे. हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्व असून विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी हे व्रत करतात. देवी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण वाचवले होते, त्या कथेची हे व्रत जोडले गेले आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वटसावित्री व्रत आणि वटपौर्णिमा यामध्ये नेमका काय फरक आहे. चला तर तो समजून घेऊया.

हेही वाचा: महिलांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या अर्ज कुठे अन् कसा करावा

वटसावित्री व्रत म्हणजे काय?

वटसावित्री व्रत हे विशेषतः ज्येष्ठ अमावस्या दिवशी केले जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. हे व्रत सावित्री–सत्यवान यांच्या कथेशी जोडलेले आहे.

वटपौर्णिमा म्हणजे काय?

वटपौर्णिमा हेच व्रत काही प्रांतांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, ज्येष्ठ पौर्णिमा दिवशी केले जाते. यालाही वटवृक्ष पूजन व सावित्री–सत्यवान कथेशीच संबंध आहे.

वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांसाठी

पहिल्यांदा वटसावित्री व्रत करणाऱ्या महिलांसाठी हा दिवस खास मानला जातो. या दिवशी माहेराकडून सुहाग साहित्य, पूजा साहित्य, फळे, मिठाई आणि इतर वस्तू पाठ्वण्याची परंपरा आहे. त्यानंतर महिला वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

मलमासामुळे (अधिक मास) व्रत सुरू करणे टाळावे का?

काही ठिकाणी असा समज पसरला आहे की, १७ मेपासून मलमास (अधिक मास) सुरू होत असल्याने यंदा पहिल्यांदाच वटसावित्री व्रत सुरू करू नये. मात्र धार्मिक जाणकारांच्या मते हा समज चुकीचा आहे. कारण वटसावित्री व्रत मलमास सुरू होण्यापूर्वीच येत आहे. त्यामुळे महिलांना कोणतीही अडचण न ठेवता हे व्रत करता येईल.

महत्त्वाच्या तारखा
वटसावित्री व्रत: १६ मे
वटपौर्णिमा: २९ जून

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts