Anand Paranjpe Resignation: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षातील ज्येष्ठ नेते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आनंद परांजपे हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. विधान परिषदेची संधी न मिळाल्याने ते असंतुष्ट
असल्याचेही सांगितले जात आहे. अखेर त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्याने पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे.
हेही वाचा: विधानभवनात फडणवीसांची रॉयल एनफिल्ड एंट्री चर्चेत; PUCवरून गायकवाडांची टीका, भाजपकडून सडेतोड उत्तर
या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर त्यांची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी लिहिले आहे की, “मानत अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझा १४ वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेले प्रेम व विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकत आहे. आणि नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे.”
या घडामोडीमुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












