Breaking News :
  • Home
  • देश
  • PM मोदींची जगभर चर्चा; परदेशी नेत्याने केलं खास कौतुक, म्हणाले, “मोदींसारखा नेता…”
Top News

PM मोदींची जगभर चर्चा; परदेशी नेत्याने केलं खास कौतुक, म्हणाले, “मोदींसारखा नेता…”

modi

Erik Solheim On PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नेतृत्वाची चर्चा संपूर्ण जगभरात होताना दिसते. आत्तापर्यंत अनेक परदेशी नेत्यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे. तर आताही पंतप्रधान मोदींचं एका परदेशी नेत्यानं खास कौतुक केलं आहे. त्यामुळे सध्या पंतप्रधान मोदी चांगलेच चर्चेत आहेत.

हेही वाचा – ‘The Family Man’ अभिनेत्याच्या पत्नीची सहाव्यांदा कर्करोगाशी झुंज; पाच शस्त्रक्रियांनंतरही लढा कायम

पंतप्रधान मोदींचं कोणत्या परदेशी नेत्यानं केलं कौतुक?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 ते 19 मे दरम्यान नॉर्वे दौऱ्यावर जाणार आहेत. तर त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची आणि धोरणांची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा होताना दिसत आहे. यामध्ये आता नॉर्वेचे माजी मंत्री आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे (UNEP) माजी प्रमुख एरिक सोल्हेम यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे.

नॉर्वेचे अग्रगण्य वृत्तपत्र ‘डेगन्स नेरिंगस्लिव्ह’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात एरिक सोल्हेम यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातिल सर्वात लोकप्रिय नेते आहेत. पाश्चात्य देशांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या ‘सातत्यपूर्ण हरित संदेशातून’ बरेच काही शिकण्यासारखे आहे. मोदींची लोकप्रियता आणि नेतृत्वशैली त्यांना परिवर्तनवादी नेते बनवते.

भारतात पंतप्रधान मोदींइतका लोकप्रिय नेता कोणत्याही मोठ्या देशात नाही. मोदींची लोकप्रियता सुमारे 70 टक्के असून ते जगातील सर्वात प्रभावशाली लोकशाही नेत्यांपैकी एक आहेत. भारताची अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वाखाली सुमारे 7 टक्के दराने वेगाने वाढत आहे, जो अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त आहे, असं एरिक सोल्हेम यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, मोदींचा जन्म गुजरातच्या वडनगरमधील एका सामान्य कुटुंबात झाला आणि स्वतःच्या प्रयत्नांनी ते देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते बनले आहेत. मी भारतातील जवळपास सर्व राज्यांना भेट दिली आहे आणि तेथील विकास सर्वत्र दिसून येत आहे. तेथे नवीन आधुनिक विमानतळे, दुर्गम भागांसाठी उत्तम रस्ते, गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे सौर उद्यान आणि आंध्र प्रदेशात एक प्रचंड मोठा सौर-पवन-जलविद्युत प्रकल्प आहे. भारतात हिंदू राष्ट्रवाद ही एक प्रमुख राजकीय शक्ती बनली आहे आणि भारतीय जनता पक्षाने समाजाच्या सर्व स्तरांवरून पाठिंबा मिळवला आहे, असंही एरिक सोल्हेम यांनी लिहिलं आहे. तसेच नॉर्वेचे भारतासोबतचे संबंध दृढ केल्याने दोन्ही देशांना मोठा फायदा होईल, असंही सोल्हेम यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts