Team India toss loss: भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील तिसरा वनडे सामना सिडनीत सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्शनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघानं पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. वनडे क्रिकेटमध्ये भारताचा हा सलग 18वा नाणेफेक पराभव आहे. या दरम्यान कर्णधार आणि संघ बदलले आहेत, परंतु नाणेफेक गमावण्याचं नशीब बदललेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिन्ही वनडे सामन्यांमध्ये शुभमन गिल कर्णधार होता आणि भारतानं तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली आहे.
नशीब बदललं नाही :(Team India toss loss)
यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं सातत्यानं नाणेफेक गमावली होती, परंतु नवीन कर्णधार शुभमन गिलच्या आगमनानंतरही ते बदललेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत, गिलनं तिन्ही वनडे सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियानं पर्थ आणि अॅडलेडमध्ये नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
INDIA HAVE LOST 18 CONSECUTIVE TOSSES IN ODI CRICKET. 🤯
– The probability of that happening is 1 in 2,62,144 (0.000381%). pic.twitter.com/92OTNHNyan
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2025
सर्वाधिक नाणेफेक गमावणारा संघ :
भारत आता वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक नाणेफेक गमावणारा संघ बनला आहे. ‘मेन इन ब्लू’ संघानं नेदरलँड्सचा विक्रम मोडला. मार्च 2011 ते ऑगस्ट 2013 दरम्यान डच संघानं 11 टॉस गमावले. यात इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी 27 जानेवारी 2023 ते 13 सप्टेंबर 2023 दरम्यान सलग नऊ टॉस गमावले आहेत.
हे हि वाचा : रोहित-विराटची दीडशतकी भागीदारी; सिडनीत भारताचा दमदार विजय
2023 पासून वनडे टॉस जिंकण्यात अपयश (Team India toss loss)
फक्त शुभमन गिलच नाही तर भारतीय संघाचीही वनडे क्रिकेटमध्ये वाईट कामगिरी आहे. 2023 पासून या फॉरमॅटमध्ये टीम इंडियानं टॉस जिंकलेला नाही. रोहित शर्मानं शेवटचा टॉस 2023 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जिंकला होता. तेव्हापासून, त्यानंतरच्या 18 वनडे सामन्यांमध्ये, भारतीय संघानं एकही टॉस जिंकलेला नाही. भारतानं या वर्षी दुबईमध्ये टॉस न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली












