Team India World Cup journey: महिला वनडे विश्वचषक 2025 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघात खेळला गेला. दोन्ही संघ त्यांचं पहिलं विजेतेपद जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले होते. मात्र, भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम सामना जिंकला. नवी मुंबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतानं शानदार कामगिरी केली. महिला विश्वचषक 2025 मधील भारतीय संघाचा प्रवास चढ-उताराचा राहिला आहे.
भारतीय संघाचा प्रवास कसा :
भारतानं विश्वचषक 2025 चा पहिला सामना 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला. पावसामुळं भारतानं 47 षटकांत 8 गडी गमावून 269 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला 45.4 षटकांत फक्त 211 धावा करता आल्या. अशाप्रकारे, डीएलएस पद्धतीनं भारताला 59 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 50 षटकांत 10 बाद 247 धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानला 159 धावांवर रोखण्यात आलं. यासह भारतानं पाकिस्तानविरुद्ध 88 धावांनी संस्मरणीय विजय मिळवला.
हे हि वाचा : भारताच्या पोरींनी जिंकलं जग; पहिल्यांदाच कोरलं विश्वचषकावर नाव
सलग तीन सामन्यांत झाला पराभव :
हिले दोन सामने जिंकल्यानंतर, टीम इंडियानं सलग तीन सामने गमावले. दक्षिण आफ्रिकेनं भारताविरुद्ध तीन विकेट्सनं विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं भारताचा तीन विकेट्सनं पराभव केला. इंग्लंडच्या महिला संघानंही टीम इंडियाविरुद्ध जोरदार कामगिरी केली आणि चार विकेट्सनं विजय मिळवला. मात्र यानंतर भारतानं दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडविरुद्ध शानदार कामगिरी केली, प्रथम फलंदाजी करताना 49 षटकांत 340/3 धावा केल्या, तर पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 44 षटकांत केवळ 271/8 धावा करता आल्या. पावसामुळं भारतानं हा सामना 53 धावांनी जिंकला. या विजयासह भारतानं उपांत्य फेरीत स्थान निश्चित केलं. तर भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळलेला लीग टप्प्यातील शेवटचा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.
𝐂.𝐇.𝐀.𝐌.𝐏.𝐈.𝐎.𝐍.𝐒 🏆
Congratulations to #TeamIndia on winning their maiden ICC Women’s Cricket World Cup 🇮🇳
Take. A. Bow 🙌#WomenInBlue | #CWC25 | #Final | #INDvSA pic.twitter.com/rYIFjasxmc
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
उपांत्य फेरीत भारताचा दमदार विजय (Team India World Cup journey)
सऱ्या उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केली. विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक धावांचा पाठलाग करुन भारतानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं 49.5 षटकांत 338 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, जेमिमा रॉड्रिग्जच्या संस्मरणीय शतकाच्या जोरावर भारतानं 48.3 षटकांत 5 गडी राखून विजय मिळवला. जेमिमानं 134 चेंडूत 127 धावांची शानदार खेळी केली. शेवटी अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं इतिहास रचला.












