Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • दिल्लीचा सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभव; RCB नं दुसऱ्यांदा जिंकली WPL ट्रॉफी
Top News

दिल्लीचा सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभव; RCB नं दुसऱ्यांदा जिंकली WPL ट्रॉफी

RCB vs DC Final

RCB vs DC Final : महिला प्रीमियर लीग 2026 च्या अंतिम सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनं पराभव करुन त्यांचा दुसरी ट्रॉफी जिंकली. दरम्यान, सलग चौथा अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्लीनं पुन्हा एकदा रिकाम्या हातानं परतला. प्रथम फलंदाजी करताना, दिल्लीनं निर्धारित 20 षटकांत 4 बाद 203 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, स्मृती मंधाना आणि जॉर्जिया वॉलच्या स्फोटक खेळीमुळं हे लक्ष्य लहान वाटलं आणि आरसीबीनं शेवटच्या षटकात सामना जिंकला.

स्मृती मंधाना आणि जॉर्जिया वॉलची दमदार खेळी :

204 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीची सुरुवात खराब झाली. ग्रेस हॅरिसला दुसऱ्या षटकात चिनेल हेन्रीनं 9 धावांवर बाद केलं. मात्र, जॉर्जिया वॉल आणि स्मृती मंधाना यांनी 165 धावांची विक्रमी भागीदारी करुन सामना संघाच्या बाजूनं झुकवला. परंतु, शेवटच्या षटकापर्यंत वॉल 79 आणि मंधाना 87 धावांवर बाद झाल्या होत्या. त्यामुळं सामना पुन्हा एकदा अडकला.

शेवटच्या षटकात 10 धावांची गरज :

शेवटच्या षटकात आरसीबीला विजयासाठी 10 धावांची आवश्यकता होती. दिल्लीकडून श्री चरणी गोलंदाजी करण्यासाठी आली. राधा यादव स्ट्राईकवर होती तिनं षटकाच्या दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारुन सामना संपवला. यासह, आरसीबीनं आपला दुसरा करंडक जिंकला आहे.

दिल्लीनं केल्या 203 धावा :

तत्पूर्वी, कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखालील फलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळं, दिल्ली कॅपिटल्सनं आरसीबीविरुद्ध चार विकेटवर 203 धावा केल्या. जेमिमानं 37 चेंडूत 57 धावा फटकावल्या, ज्यामध्ये आठ चौकारांचा समावेश होता. लॉरा वोल्वार्ड (44 धावा, 25 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार) आणि चिनेल हेन्री (नाबाद 35 धावा, 15 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी 24 चेंडूत 55 धावांची दमदार भागीदारी करुन संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेमिमानं वोल्वार्डसोबत तिसऱ्या विकेटसाठी 76 धावा जोडल्या.

दिल्लीला चांगली सुरुवात :

बंगळुरुची कर्णधार स्मृती मंधानानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, त्यानंतर लिझेल ली (37) आणि शेफाली वर्मा (20) यांनी दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात करून दिली. शेफालीनं डावातील पहिला चौकार लॉरेन बेलच्या चेंडूवर मारला, तर लिझेलनं सायली सातघरेच्या चेंडूवर सलग दोन षटकार मारले. शेफालीनं अरुंधती रेड्डीच्या चेंडूवर दोन चौकार मारले पण त्याच षटकात विकेटकीपर ऋचा घोषनं तिला झेलबाद केलं. पॉवर प्लेमध्ये दिल्लीनं एका विकेटच्या मोबदल्यात 53 धावा केल्या.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts