Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर; झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव
क्रीडा

टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर; झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव

Zimbabwe Beat Australia

 

Zimbabwe Beat Australia : टी-20 विश्वचषक 2026 चा 19 वा साखळी सामना 13 फेब्रुवारी रोजी कोलंबो इथं ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात झिम्बाब्वेनं मोठा धक्का देत ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा स्थायी कर्णधार ट्रॅव्हिस हेडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी करायला बोलावण्यात आलं. यानंतर प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 20 षटकांत 2 गडी गमावून 169 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी 170 धावांची आवश्यकता होती, परंतु 19.3 षटकांत ते 146 धावांवरच सर्वबाद झाले आणि अखेर त्यांचा पराभव झाला.

झिम्बाब्वेची दमदार फलंदाजी : नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर झिम्बाब्वेनं चांगली सुरुवात केली. तादिवानाशे मारुमानी आणि ब्रायन बेनेट यांनी पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. मारुमानी 21 चेंडूत 35 धावा काढून बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर रायन बर्ल फलंदाजीसाठी आला. त्यानं आणि ब्रायन बेनेटनं दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. बर्ल 30 चेंडूत 35 धावा करुन बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर ब्रायन बेनेट आणि कर्णधार सिकंदर रझा यांनी शेवटपर्यंत फलंदाजी केली. बेनेटनं 56 चेंडूत सात चौकारांसह नाबाद 64 धावा केल्या. त्यानंतर सिकंदर रझा 13 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सपशेल अपयशी : ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. चार फलंदाज बाद झाले आणि त्यांच्याकडे फक्त 29 धावा होत्या. जोश इंग्लिस (8), ट्रॅव्हिस हेड (17), कॅमेरॉन ग्रीन आणि टिम डेव्हिड हे सर्वजण न स्वतात बाद झाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी 77 धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल 32 चेंडूत 31 धावा करुन बाद झाला. त्याच्या बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पुन्हा डळमळीत झाला. रेनशॉ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, त्यानं 44 चेंडूत 65 धावा केल्या, मात्र तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.

 

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts