Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • क्रिकेट क्षेत्रात खळबळ! मुंबईत बीसीसीआय संबंधित विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमय मृत्यू
Top News

क्रिकेट क्षेत्रात खळबळ! मुंबईत बीसीसीआय संबंधित विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमय मृत्यू

William Legnford death Mumbai

William Legnford death Mumbai : क्रिकेट क्षेत्रातून एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आलीय. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यातील आयपीएल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने १३ वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर एक धक्कादायक आणि गूढ घटना समोर आलीय.

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे ३० मार्च रोजी, मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरातील पंचतारांकित ट्रायडन्ट हॉटेलमध्ये बीसीसीआयशी संबंधित एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव विल्यम लेग्नफोर्ड (William Legnford) असून, ते बीसीसीआयचे ब्रँड कास्ट इंजिनियर होते. आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी ते मुंबईत आले होते. ते २४ मार्चपासून ट्रायडन्ट हॉटेलच्या रूम नंबर २७१५ मध्ये थांबले होते.

कर्मचाऱ्यांना दिसले धक्कादायक दृश्य

३० मार्च रोजी सकाळी रिसेप्शनिस्टने त्यांना फोन केला. पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेल कर्मचाऱ्यांनी रूममध्ये जाऊनही उत्तर न मिळाल्याने मास्टर कीने रूम उघडली. आत गेल्यावर कर्मचाऱ्यांना धक्कादायक दृश्य दिसले. तातडीने बोलावलेल्या डॉक्टरांनी विल्यम लेग्नफोर्ड यांना मृत घोषित केले.

मरिन ड्राईव्ह पोलीसांकडून तपास सुरू

या प्रकरणाची नोंद मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अहवाल आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

कोण होते विल्यम लेग्नफोर्ड?

विल्यम लेग्नफोर्ड हे मूळचे ब्रिटिश नागरिक होते. ते आयपीएल २०२६ साठी मुंबईत काम करत होते. या गूढ मृत्यूमुळे आयपीएल वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts