Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • कुठलाही तोरा चालणार नाही…, मेंटॉस बाई म्हणत रूपाली ठोंबरेंचा रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल, केली खोचक टीका
Top News

कुठलाही तोरा चालणार नाही…, मेंटॉस बाई म्हणत रूपाली ठोंबरेंचा रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल, केली खोचक टीका

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून अनेक पीडित महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच ज्या महिला महिला आयोगाकडे आपल्या तक्रारी, समस्या घेऊन जात होत्या त्यांना अशोक खरातकडे पाठवलं जायचं, अशी माहिती देखील समोर आली आहे. तर या प्रकरणावरून रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत.

हेही वाचा – खरातचे प्रस्त वाढवण्यासाठी रूपाली चाकणकर…, सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, थेट एसआयटीला विचारला जाब

रूपाली चाकणकर यांना विशेष तपास पथकानं नोटीस पाठवली आहे. तरीही त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीयेत. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरेंनी (Rupali Patil Thombre) हल्लाबोल करत चाकणकरांवर खोचक टीका केली आहे.

रूपाली ठोंबरेंनी रूपाली चाकणकरांवर नेमकी काय केली टीका?

माध्यमांशी संवाद साधताना रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, रूपाली चाकणकरांना एसआयटीने नोटीस बजावली आहे. असं असतानाही त्या चौकशीला हजर राहिलेल्या नाहीयेत. जर त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत तर त्यांना अटक होऊ शकते. ही एक कायद्याचीच प्रक्रिया आहे, असं ठोंबरे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, खरात प्रकरणाचा तपास एसआयटी करत आहे. तर एसआयटीने रूपाली चाकणकरांना नोटीस बजावली आहे. आज या गोष्टीला आठ दिवस झाले आहेत. त्यामुळे आता त्या आजाराचं कारण देऊ शकत नाहीत. एसआयटीने कोणत्यातरी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे या गैरसमजात त्या असतील. मात्र, हे कसलंही निमंत्रण नसून एका भयंकर गुन्ह्यासाठीचं समन्स आहे, असं रूपाली ठोंबरे म्हणाल्या.

आत्ता चाकणकरांनी आजाराचं कारण सांगितलं आहे, पण नंतर त्यांना चौकशीला जावंच लागेल. जर त्या गेल्या नाहीत तर त्यांना अटक करावी लागेल. तिथे त्यांचा कुठलाही तोरा चालणार नाही. जी व्यक्ती महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षपदी होती अशा व्यक्तीला कुठलंही गांभीर्य नाहीये. या गोष्टीचा मला खेद वाटतो. ही बाई मेंटॉस बाई आहे, अशी खोचक टीका रूपाली ठोंबरेनी केली.

अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर या आरोपी आहेत. त्यामुळे चौकशीदरम्यान त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये. सगळा मागचा इतिहास जरी काढला तरी त्यांच्या चुकांवर त्या कधी बोलणार नाहीत, असंही रूपाली ठोंबरे म्हणाल्या.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts