Gold Silver Price Fluctuation War Impact : आखाती देशांमधील तणावामुळे गेल्या काही दिवसांत सोनं-चांदीच्या दरात (Gold and Silver Rates) मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. काही काळ दरांनी उच्चांक गाठला होता, मात्र आता सोन्याच्या किमतीत घसरण (Decline in Gold Prices) दिसून येत आहे. तरीही बाजारातील अस्थिरता कायम (Instability persists) आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांनी सोनं-चांदी खरेदी (Gold and Silver Purchase) करणं फायदेशीर ठरेल का? पाहूया हे या लेखातून पाहू…
आखाती देशांतील संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. या तणावामुळे सोनं-चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या किमतींनी उच्चांक गाठला होता. मात्र, महिनाभर सुरू असलेल्या या तणावानंतर, अमेरिकेने 6 एप्रिलपर्यंत इराणवर कोणताही हल्ला केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा – मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क ₹10 ने कमी; इंधन स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 44 हजार 870 रुपये इतका
त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा बदलताना दिसत आहे, आणि सोन्याच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 44 हजार 870 रुपये इतका होता. तर मुंबईत हाच दर 1 लाख 44 हजार 770 रुपये नोंदवण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस 4 हजार 416 डॉलरवर पोहोचला आहे.
चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 39 हजार 900 रुपये इतका
सोन्यानंतर चांदीच्या दरांकडे पाहिलं तर, चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. आज, 28 मार्च रोजी चांदीचा दर प्रति किलो 2 लाख 39 हजार 900 रुपये इतका आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सिल्व्हरचा स्पॉट दर 68.12 डॉलर प्रति औंस इतका नोंदवला गेला आहे. जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सोनं-चांदीच्या दरांवर होताना दिसत आहे.
गुंतवणूक करण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं
तज्ञांच्या मते, बाजारातील ही अस्थिरता अजून काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी दरांचा ट्रेंड आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं ठरणार आहे. सोनं-चांदी खरेदी करताना घाई न करता योग्य वेळ साधणं, हेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी फायद्याचं ठरू शकतं.












