Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का; पंतप्रधान मोदी, गडकरी, फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
Top News

आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशाला धक्का; पंतप्रधान मोदी, गडकरी, फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Asha Bhosle Passes Away | आज (12 एप्रिल) ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं निधन झालं आहे. आशा भोसले यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना शनिवारी (11 एप्रिल) हृयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली; कधी, कुठे होणार अंत्यसंस्कार? जाणून घ्या

आशा भोसले यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी व्यक्त केला शोक

आशा भोसले यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बड्या नेच्यांनी शोक व्यक्त केला आहे.

आशा ताईंसोबतच्या आठवणींना पंतप्रधान मोदींनी दिला उजाळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर आशा भोसले यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केरत लिहिलं आहे की, “भारताच्या सर्वात प्रसिद्ध आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजींच्या निधनाने मला खूप दुःख झालं आहे. अनेक दशके चाललेल्या त्यांच्या विलक्षण संगीत प्रवासाने आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. मग त्या त्यांच्या हृदयस्पर्शी सुरावटी असोत किंवा त्यांच्या भावपूर्ण रचना असोत, त्यांच्या आवाजात नेहमीच एक अनोखी चमक होती. त्यांच्यासोबतच्या माझ्या भेटीगाठींच्या आठवणी मी नेहमीच जपून ठेवीन. त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्या येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम गुंजत राहतील”, असं पंतप्रधान मोदींची म्हटलं आहे.

नितीन गडकरींनी आशा ताईंना अर्पण केली श्रद्धांजली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नितीग गडकरींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “भारतीय संगीत क्षेत्रातील एक प्रख्यात आणि दिग्गज व्यक्तिमत्व, पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांचे निधन ही भारतीय संगीत क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी आहे.

आपल्या विलक्षण प्रतिभेने आशा ताई यांनी संगीत क्षेत्रात स्वतःचे एक अनोखे स्थान निर्माण केले आहे. आपल्या आवाजाने आशा ताईंनी ‘नया दौर’, ‘तिसरी मंझिल’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘उमराव जान’, तसेच ‘इजाजत’ आणि ‘रंगीला’ यांसारखे अनेक प्रसिद्ध चित्रपट आणि गाणी अजरामर केली, जी काळ आणि पिढ्यांनुसार बदलली आहेत. पार्श्वगायिका म्हणूनही त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी दिली. त्यांचा आवाज आणि संगीतातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो”, असं म्हणत गडकरींनी आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहिली आहे.

संगीताचा दुसरा ताराही आज नाहीसा झाला…,मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक

नितीन गडकरींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आशा ताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री फडणवी म्हणाले की, “संपूर्ण भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी हा अत्यंत दुःखद काळ आहे. लता दीदींच्या रूपातील पहिला तारा आपण मावळताना पाहिला, संगीताचा दुसरा ताराही आज नाहीसा झाला आहे, याबद्दल आम्हा सर्वांना खूप दुःख झाले आहे.

बालपणापासून वयाच्या 92 व्या वर्षापर्यंत त्यांनी अविरतपणे संगीताची सेवा केली. आपल्या 90 व्या वाढदिवशी 3 तासांचा संगीत कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या जगातील एकमेव गायिका आहेत. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संगीताची सेवा केली. आपल्या सर्वांना माहीत आहे की, शास्त्रीय संगीतापासून ते पॉप, रॉकपर्यंत त्यांनी आपल्याला सर्व प्रकारचे संगीत दिले, सर्व प्रकारची गाणी गायली, विशेषतः आर. डी. बर्मनजींनी संगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेले आणि भारतात अशी कोणतीही भाषा नाही ज्यात त्यांनी गाणे गायले नाही. त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये 12,000 हून अधिक गाणी गायली आहेत. ज्यांच्यामध्ये देव वास करत होता अशा एका अद्वितीय गायिकेचे निधन ही भारतासाठी एक मोठी हानी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts