Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • आशा भोसले यांच्या तब्येतीबाबत कुटुंबीयांनी दिली महत्त्वाची माहिती, सध्या कशी आहे प्रकृती?
Top News

आशा भोसले यांच्या तब्येतीबाबत कुटुंबीयांनी दिली महत्त्वाची माहिती, सध्या कशी आहे प्रकृती?

asha bhosle

Asha Bhosle Health Update | प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना शनिवारी हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आशा भोसले यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

हेही वाचा – “मौलाना पवार, तुम्ही जाळीची टोपी परिधान इफ्तार पार्टीचे आयोजन करता”; तुषार भोसलेंची जहरी टीका

आशा भोसले यांची प्रकृती सध्या कशी आहे?

आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीनं मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर सध्या त्यांना आत्पकालीन वैद्यकीय सेवा विभागात ठेवण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती ब्रीच कँडी रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. तसेच आता आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

कुटुंबीयांनी काय दिली माहिती?

आशा भोसले यांनी नात जनाई भोसलेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जनाई भोसलेने म्हटलं आहे की, माझी आजी आशा भोसले यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे आणि थकवा जाणवत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कृपया सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा ही नम्र विनंती. तसेच लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. लवकरच आम्ही सकारात्मक अपडेट देऊ, असं जनाईने पोस्ट करत म्हटलं आहे.

आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे आणि नाराजीचे वातावरण आहे. आशा भोसले यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून प्रार्थना केली आहे.

दरम्यान, आशा भोसले या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी 1948 साली आपल्या कारकि‍र्दीची सुरूवात केली होती. त्यांनी आत्तापर्यंत सुमारे 16,000 गाणी गायली आहेत. यामध्ये त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, इंग्रजी, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तर आशा भोसले यांनी आपल्या अनेक पुरस्कार, सन्मान केले आहेत. 2008 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर आशा भोसले यांच्या गाण्यांच्या जादूने त्यांचा चाहतावर्ग आज लाखोंच्या संख्येत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts