• Home
  • मनोरंजन
  • आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार; राज्यभरात शोककळा
Mumbai

आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार; राज्यभरात शोककळा

asha bhosle 3

Asha Bhosle Funeral | प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं रविवारी (12 एप्रिल) दु:खद निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली आहे. तर आज दुपारी 4 वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नजर; इराणवरील सागरी नाकेबंदीमुळे तणाव वाढला

आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

आशा भोसले यांच्या लोअर परेळ येथील निवासस्थानी सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर आज आशा भोसलेंच्या अंतिम दर्शनासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चित्रपटसृष्टी, संगीत क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो चाहते आज आशा ताईंच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

आशा भोसले यांचं रविवारी ब्रीच कँडी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं मल्टी आर्गन फेल्युअरमुळे निधन झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर आज आशा ताईंच्या निधनानं संपूर्ण देश दु:खात बुडालेला आहे. तसेच आशा ताईंच्या चाहत्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी, सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान, आशा भोसले यांच्या खास आवाजाने आणि विविधतापूर्ण गायनशैलीने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांनी मराठीसह हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये पार्श्वगायन करून भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक अजरामर नाव कमावले आहे. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली होती. तर वयाच्या 90 व्या वर्षापर्यंतही त्यांचं गायन सुरू होतं. हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं. रफी, मुकेश आणि किशोर यांच्यापासून ते बॉय जॉर्ज आणि आदित्य नारायण यांच्यापर्यंतच्या कलाकारांसोबत त्यांनी गाणी गायली होती. 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमीसाठी नामांकन मिळालं होतं.

आशा भोसले यांनी आत्तापर्यंत सुमारे 16,000 गाणी गायली आहेत. यामध्ये त्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, इंग्रजी, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तर आशा भोसले यांनी आपल्या अनेक पुरस्कार, सन्मान केले आहेत. 2008 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर आशा भोसले यांच्या गाण्यांच्या जादूने त्यांचा चाहतावर्ग आज लाखोंच्या संख्येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts