Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नजर; इराणवरील सागरी नाकेबंदीमुळे तणाव वाढला
Top News

होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नजर; इराणवरील सागरी नाकेबंदीमुळे तणाव वाढला

US-Iran War | इस्लामाबादमध्ये अमेरिका (US) आणि इराण (Iran) यांच्या युद्धविरामाबाबत चर्चा झाली होती. मात्र, दोन्ही देशांमधील मतभेदांमुळे ही चर्चा फिस्कटली. ही चर्चा अपयशी ठरल्यामुळे आता पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणसोबतची चर्चा अनिर्णित राहिल्यामुळे अमेरिकेने आता मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची नजर आता होर्मुझ सामुद्रधुनीवर (Hormuz Strait) असून त्यांनी या सामुद्रधुनीचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – राजकीय हस्तक्षेपावरून नवा वाद; सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेचे सैन्य इराणवर सागरी नाकेबंदी लादणार

अमेरिकेचे सैन्य आता इराणवर सागरी नाकेबंदी लादणार आहे. याबाबतची घोषणा युनायटेड स्टेट्‍स सेंट्रल कमांडने केली आहे. युनायटेड स्टेट्‍स सेंट्रल कमांडने केलेल्या घोषणेनुसार, इराण बंदरांजवळ 13 एप्रिलपासून सागरी नाकेबंदी लागू केली जाणार आहे. ही सागरी नाकेबंदी ही इराणी बंदरे आणि किनारी भागांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व देशांच्या जहाजांना समान रीतीने लागू केली जाणार आहे. अमेरिकेने हे मोठे पाऊल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या निर्देशानुसार उचलले आहे.

युनायटेड स्टेट्‍स सेंट्रल कमांडने पुढे म्हटलं आहे की, ही सागरी नाकेबंदी इराणच्या बंदरांकडे आणि किनारपट्टीच्या भागांत येणाऱ्या किंवा तेथून जाणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांवर निःपक्षपातीपणे लागू केली जाणार आहे. यामध्ये अरबी आखात आणि ओमानच्या आखातातील सर्व इराणी बंदरांचा समावेश आहे. आमचे सैन्य होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गैर-इराणी बंदरांकडे किंवा तेथून येणाऱ्या जहाजांच्या मुक्त संचारात अडथळा आणणार नाही, असंही युनायटेड स्टेट्‍स सेंट्रल कमांडने सांगितले आहे.

या सागरी नाकेबंदीबाबत युनायटेड स्टेट्‍स सेंट्रल कमांडने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “राष्ट्रपतींच्या घोषणेनुसार 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून इराणी बंदरांकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीवर नाकेबंदी लागू करण्यास आम्ही सुरुवात करू, असं युनायटेड स्टेट्‍स सेंट्रल कमांडने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एकिकेडे अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी ठरली आहे. तर दुसरीकडे आता अमेरिकेच्या सैन्याने इराण बंदराजवळ सागरी नाकेबंदी केली आहे यामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता मध्य पूर्वेत पुन्हा युद्ध होणार का? असा सवाल सध्या निर्माण केला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts