Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली; कधी, कुठे होणार अंत्यसंस्कार? जाणून घ्या
Top News

आशा भोसले यांची प्राणज्योत मालवली; कधी, कुठे होणार अंत्यसंस्कार? जाणून घ्या

Asha Bhosle Passes Away | आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. तर त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आशा भोसले यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांना शनिवारी (11 एप्रिल) हृयविकाराचा झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली.

हेही वाचा – हाताचे ठसे, कडी, औषध अन्…, खरातच्या कार्यालयावर पुन्हा एसआयटीचा छापा, सापडले गंभीर पुरावे, नवा खुलासा होणार?

आशा ताईंवर कुठे, कधी होणार अंत्यसंस्कार?

आज मुंबईत आशा भोसले यांचं निधन झालं. काही वेळापूर्वीच आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आशाताईंच्या निधनाची दु:खद बातमी दिली. यादरम्यान आनंद भोसले यांच्यासोबत आशिष शेलार देखील उपस्थित होते.

आशिष शेलार यांनी देखील आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. आशिष शेलार म्हणाले की, आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीयेत. आज त्यांच्या सर्व मेडिकल गोष्टी पूर्ण होतील. आशा ताईंचं निवासस्थान हे लोअर परळला आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी उद्या (13 एप्रिल) सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं असून आशा ताईंवर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.

आशा भोसले यांचं मल्टी आर्गन फेल्युअरमुळे निधन झालं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर आज आशा ताईंच्या निधनानं संपूर्ण देश दु:खात बुडालेला आहे. आशा ताईंच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज आशा ताईंच्या चाहत्यांसह अनेक राजकीय नेत्यांनी, सिनेसृष्टीतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts