Ashes series begins : जगातील सर्वात मोठी कसोटी मालिका, अॅशेस, आता काही तासांवर आली आहे. ही ऐतिहासिक मालिका ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. या मालिकेत एकूण पाच कसोटी सामने खेळले जातील, जे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग आहेत. दरम्यान, या मालिकेबद्दल भारतात प्रचंड उत्साह आहे.
पहिला अॅशेस कसोटी सामना 21 नोव्हेंबरपासून
ऑस्ट्रेलियातील अॅशेस मालिकेचा पहिला सामना 21 नोव्हेंबरपासून पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल. यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनं आधीच त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे, जरी शेवटच्या क्षणी बदल शक्य आहेत. अॅशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळली जात असली तरी, त्यामुळं संपूर्ण क्रिकेट जगतात उत्साह निर्माण होतो. ही मालिका दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेची आहे. ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश क्रिकेट संघ कोणताही सामना गमावू शकतात, परंतु अॅशेस गमावणं त्यांच्यासाठी अत्यंत अपमानजनक मानलं जातं.
पर्थची खेळपट्टी कशी असेल ?
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटवर जलद गोलंदाजांचं वर्चस्व असते आणि 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पर्थ स्टेडियमवर होणाऱ्या अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यातही असंच घडू शकते. या स्टेडियमवर आतापर्यंत पाच सामने खेळले गेले आहेत आणि सर्वांचा निकाल लागला आहे. यजमान ऑस्ट्रेलियानं यापैकी चार जिंकले आहेत, तर भारतानं एक जिंकला आहे. पर्थ स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सर्व कसोटी सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळं, या सामन्यात टॉस महत्त्वाची भूमिका बजावेल, कारण विजेत्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यास वेळ लागणार नाही.
भारतात किती वाजता सुरु होणार सामना
पर्थमध्ये पहिला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना सकाळी 7:50 वाजता सुरु होईल, याचा टॉस अर्धा तास आधी होईल. तसंच हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सद्वारे टीव्हीवर आणि तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर जिओ हॉटस्टारद्वारे सामने थेट पाहू शकता. म्हणूनच, स्टार नेटवर्कनं व्यापक तयारी केली आहे आणि अनुभवी समालोचकांना सामना कव्हर करण्यासाठी व्यवस्था केली आहे, जेणेकरून तुम्ही खेळाचे बारकावे समजून घेताना सामना पाहू शकाल.
दोन्ही संघाचे खेळाडू
इंग्लंड संघ : बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, ब्रायडन कार्स, शोएब बशीर, जेकब बेथेल, मॅथ्यू पॉट्स, जोश टंग, विल जॅक्स
ऑस्ट्रेलिया संघ : उस्मान ख्वाजा, जेक वेदरल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, ब्रेंडन डॉगेट, स्कॉट बोलँड, ब्यू वेबस्टर, जोश इंग्लिस, मायकेल नेसर












