Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • कोठडीतील दिवस पडले भारी; भोंदू खरातचं वजन घटलं, प्रकृती खालावली
Top News

कोठडीतील दिवस पडले भारी; भोंदू खरातचं वजन घटलं, प्रकृती खालावली

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदुबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. अशोक खरातने अनेक महिलांचा गैरफायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) खरातला अटक केली आहे. तर सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे.

हेही वाचा –  खळबळजनक! खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला, काचांवर हात मारले, गनमॅनला बाहेर ओढले अन्…, नेमकं घडलं काय?

विविध आजार झाल्यामुळे अशोक खरातची प्रकृती खालावली

मागील महिन्यात 18 मार्च रोजी ढोंगी खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तर आता त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिलांचे लैंगिक शोषण, लोकांची आर्थिक फसवणूक, जमिन-जुमला लुट्याप्रकरणी खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याच्या कोठडीत वाढ केली आहे. सध्या एसआयटी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. तर एसआयटीच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे.

अशोक खरातच्या अंगाशी आता त्याचे कुकर्म आले आहे. जो अशोक खरात लोकांना लुबाडत ऐशो आरामात राहत होता त्या ढोंगी खरातवर आता छोट्याशा कोठडीत राहण्याची वेळ आली आहे. कोठडीत नराधम खरातला हालाखीचे जीवन जगावे लागत आहेत. तर आता खरातच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

अशोक खरातचं वजन कमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. खरातचे वजन कमी झाले असून त्याची प्रकृती बिघडली आहे. खरातला विविध आजार झाल्यामुळे त्याचं शरीर आतून पोखरलं गेलं आहे. खरातला पाच वेगवेगळे आजर झाले असून त्याची प्रकृती खालावली आहे. सतत होणारी चौकशी यामुळे खरात तणावाखाली गेला आहे. तर प्रकृती खालावल्यामुळे तो औषध-गोळ्या घेत आहे. तसेच खरातचे वजन कमी झाल्यामुळे त्याला त्याची प्रकृती साथ देत नसल्याची माहिती समोर आली आहे.

मागील 2 आठवड्यांपासून एसआयटीकडून आणि नाशिक पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यामध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार, लोकांची आर्थिक फसवणूक, लुबाडलेल्या जमीन जुमला अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

अशोक खरातने अनेक महिलांवर, तरूणींवर अत्याचार केला आहे. मात्र, अशोक खरातच्या जाळ्यात महिला कशा अडकत होत्या? याबाबतची माहिती देखील आता समोर आली आहे. महिला आपल्या घरगुती, वैयक्तिक आयुष्याबाबतच्या समस्या घेऊन खरातकडे जात होत्या. तेव्हा ढोंगी खरात महिलांना गोड बोलत त्यांचा विश्वास जिंकत त्यांच्याशी जवळीक साधत त्यांचा गैरफायदा घेत होता.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts