Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • खळबळजनक! खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला, काचांवर हात मारले, गनमॅनला बाहेर ओढले अन्…, नेमकं घडलं काय?
Top News

खळबळजनक! खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला, काचांवर हात मारले, गनमॅनला बाहेर ओढले अन्…, नेमकं घडलं काय?

MP Shashi Tharoor Convoy Attacked | नुकतीच एक खळबळजनक घटना घडली आहे. काँग्रेसचे (Congress) खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या ताफ्यावर अचानक काही जणांनी हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – रात्रीचा अंधार अन् काळाने घाला घातला; नाशिकमध्ये कार विहिरीत पडून 9 जणांचा दुर्दैवी अंत

शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला कसा झाला? नेमकं घडलं काय?

मल्लपुरम जिल्ह्याती वांडूर येथे शशी थरूर यांची कार काही लोकांनी थांबवत हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, शशी थरूर हे UDF उमेदवार एपी अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी वांडूर येथे दाखल झाले होते. यादरम्यान दोन गाड्या होत्या. एका कारमध्ये शशी थरूर होते तर दुसऱ्या कारमध्ये बॉडीगार्ड आणि गनमॅन होते. यावेळी अचानक 10-15 लोकांचा जमाव शशी थरूर यांच्या कारसमोर आला आणि त्यांनी कार थांबवली. या जमावाने थरूर यांच्या कारच्या काचांवर हात मारले आणि त्यांनी कार पुढे जाऊ दिली नाही.

ज्यावेळी शशी थरूर यांच्या कारवर हल्ला करण्यात आला तेव्हा गनमॅन आणि बॉडीगार्ड त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीनं बाहेर आले. तेव्हा जमावाने एका गनमॅनवरही हल्ला केला आणि त्याला कारच्या बाहेर ओढत मारहाण केली. सुदैवानं या हल्ल्यात शशी थरूर यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर या हल्ल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शशी थरूर यांच्यावर केलेला हल्ला सुनियोजित?

शशी थरूर यांनी त्यांच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला सुनियोजित असल्याचा आरोप केला आहे. हा हल्ला विरोधकांनी केला असल्याचा आरोप थरूर यांनी केला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वांडूर पोलीस स्थानकात विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून जमावातील 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून हा हल्ला नेमका कोणी घडवून आणला? याचा तपास केला जात आहे.

शशी थरूर यांच्यावर हल्ला झालेल्या संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहेत. तसेच पोलिसांनी स्थानिक नागरिकांचे जबाबही नोंदवले आहेत. तर पोलिसांनी जमावातील दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सोबतच या घटनेमुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts