Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवाला धोका; SIT चा मोठा निर्णय, न्यायालयानेही दिला ग्रीन सिग्नल
Top News

भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवाला धोका; SIT चा मोठा निर्णय, न्यायालयानेही दिला ग्रीन सिग्नल

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला अटक केली आहे. तर काल खरातची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी विशेष तपास पथकाच्या (SIT) अधिकाऱ्यांनी काही पुरावे कोर्टात सादर केले. त्यानंतर कोर्टाने खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच आजही खरातला कोर्टात हजर केलं जाणार होतं.

हेही वाचा – राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचे 25-30 आमदार भाजपमध्ये जाणार? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

खरातच्या जीवाला धोका, SIT नं काय घेतला मोठा निर्णय?

अशोक खरातला आज आणखी एका दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार होतं. मात्र, खरातच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आल्यामुळे विशेष तपास पथकाने मोठा निर्णय घेतला आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवाला धोका असल्यामुळे विशेष तपास पथकाने न्यायालयाकडे ऑनलाईन सुनावणी करण्याची विनंती केली होती. तर खरातच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने देखील एसआयटीची ही विनंती मान्य केली आहे. त्यामुळे आज सुनावणीसाठी खरातला न्यायालयात हजर केलं जाणार नाहीये. ऑनलाईन पद्धतीनेच आजची सुनावणी घेतली जाणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायाधीश नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, काल न्यायालयाने अशोक खरात प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे. अशोक खरातला न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्याय‍धीशांनी काही कागदपत्रे तपासली आणि बाकी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये अशोक खरातला न्यायाधीशांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर आजच्या ऑनलाईन सुनावणीत न्यायाधीश नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खरातने अनेक भक्तांची आर्थिक फसवणूक देखील केल्याचं समोर आलं आहे. खरातच्या या काळ्या कारनाम्यांमुळे संपू्र्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts