Mango Rate | सध्या संपूर्ण राज्यात उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे. उन्हाळ्याला सुरूवात झाल्यापासून सर्वांचा आवडता आंबाही (Mango) बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. बाजारात आंबा आला असला तरी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण यंदा आंब्याचे दर (Mango Rates) गगनाला भिडले आहेत. राज्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी अंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा – भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवाला धोका; SIT चा मोठा निर्णय, न्यायालयानेही दिला ग्रीन सिग्नल
आंब्याचे कोणत्या भागात किती आहेत दर?
आवक कमी असल्यामुळे यंदा हापूस आंब्याच्या (Hapus Mango) दरात मोठी वाढ झाली आहे. हापूस सोबत रत्नागिरी आणि देवगड आंब्याच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. तर राज्यातील विविध शहरांमध्ये आंब्यांचे वेगवेगळे दर पाहायला मिळत आहेत.
पुणे शहरात आंब्याचे दर 2,300 ते 2,600 रूपये प्रति डझन एवढे आंब्याचे दर आहेत. तर मुंबईत हापूस आंबा 2,500 रूपये ते 7,000 रूपये प्रति डझन एवढा आंब्याचा दर आहे. नाशिकमध्ये 1,500 ते 1800 रूपये दर असून बारामतीमध्ये 1,700 ते 2,200 रूपये प्रति डझन दर आहे. तसेच मराठवाड्यात 1,500 ते 4,000 रूपये प्रति डझन एवढा दर आहे तर जळगावमध्ये 1,000 ते 1,100 रूपये प्रति डझन एवढा दर आहे. सोलापूरमध्ये 1,200 रूपये एवढा आंब्याचा दर आहे.
हापूसचे माहेरघर असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आंब्याचे दर चांगलेच वाढले आहेत. रत्नागिरीत हापूस आंबा 1,000 ते 2,000 रूपये प्रति डझन किंमतीने विकला जात आहे. तर देवगड हापूस आंबा हा 1,500 ते 3,000 रूपये प्रति डझन किंमतीने विकला जात आहे. तसेच आंब्याच्या 4 ते 6 डझनाच्या पेटीसाठी 5 ते 6 हजार रूपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.
एकिकेड राज्यातील काही भागांमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे. तर काही भागांमध्ये अजूनही आंबा उपलब्ध झालेला नाहीये. हिंगोली, वर्धा, पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या भागांमध्ये आंबा अजूनही दाखल झालेला नाहीये. तसेच सध्या ज्या भागांमध्ये आंबा उपलब्ध झाला आहे तिथे आंब्याचे दर तेजीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसताना दिसत आहे.












