Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. तसेच त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आता अशोक खरात प्रकरणाचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. तर या तपासादरम्यान दररोज नवनवीन खुलासे होतना दिसत आहेत. आताही खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – “…तर आम्ही कोलकत्यावर हल्ला करू”, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या पोकळ धमकीने युद्ध पेटणार?
अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट
मागील काही दिवसांपासून अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार आहे. विशेष तपास पथकानं अशोक खरातच्या नाशिक येथील बंगल्यावर मध्यरात्री छापा टाकला होता. तर बंगल्याचे गेट कोणीही न उघडल्याने काही अधिकाऱ्यांनी शेजारील बंगल्यावरून उडी मारून खरातच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी खरातची बायको कल्पना खरात ही फरार असल्याचं समोर आलं. तर विशेष तपास पथकानं खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेतलं होतं.
विशेष तपास पथकानं हर्षवर्धन खरातची दोन दिवस कसून चौकशी केली होती. अशातच आता हर्षवर्धनही फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर आणखी एक नवे आव्हान उभे राहिले आहे. आधी खरातची बायको फरार झाली आणि आता खरातचा मुलगा फरार झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची पोलीस चौकशी करत होते. यामध्ये पोलिसांनी हर्षवर्धनला ताब्यात घेत त्याची दोन दिवस कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्याला सोडण्यात आले होते. तर चौकशी झाल्यानंतर हर्षवर्धनने पोलिसांना कोणतीही माहिती न देता तो अचानक शहरातून गायब झाला आहे. त्यामुळे आता नाशिक पोलीस खरातच्या पत्नीचा आणि खरातच्या मुलागा शोध घेत आहेत. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत.
ढोंगी खरातच्या मुलाने पोलिसांना दिली धक्कादायक माहिती
चौकशीदरम्यान हर्षवर्धनने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने पोलिसांसमोर कबूल केले की, आमच्या घरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कॅश येत होती. ते पैसे कुठून येत होते याबाबत मला काहीही माहिती नाही. कारण या पैशांचे सर्व व्यवहार डॅड अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती होती, अशी कबुली हर्षवर्धने दिली आहे. खरातच्या मुलाने दिलेल्या जबाबनंतर खरातने फक्त महिलांचा लैंगिक छळच केला नाही तर लोकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात केल्याचंही समोर आलं आहे.












