Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • महागडे फेशियल विसरा! कच्च्या दुधाने त्वचा होईल उजळ आणि मऊ, जाणून घ्या फायदे
ताज्या बातम्या

महागडे फेशियल विसरा! कच्च्या दुधाने त्वचा होईल उजळ आणि मऊ, जाणून घ्या फायदे

Raw Milk Benefits For Skin | दूध (Milk) हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. हजारो वर्षांपासूव दुधाने स्नान करण्याची परंपरा चालत आलेली आहे. याचे कारण असे की, दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.  तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक साबण आणि फेस वॉशमध्येही दुधाचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या निगा राखण्याच्या नित्यक्रमात दुधाचा समावेश करू शकता. रोज चेहरा धुतल्यानंतर काही वेळ दुधाने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचा चमकदार होते.  चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावर कच्चे दूध लावण्याचे काय फायदे आहेत.

कच्च्या दुधाचे काय फायदे होतात?

दररोज चेहऱ्यावर कच्चे दूध (Raw Milk) लावल्याने त्वचेची खोलवर स्वच्छता होते आणि त्वचेची चमक वाढते. कच्च्या दुधातील घटकांमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही त्वचेच्या काळजीच्या नित्यक्रमात याचा नक्की समावेश करा. दुधाने मसाज केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात.

कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून सुटका मिळवण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर केला जाऊ शकतो. कच्चे दूध त्वचेला आर्द्रता देते. यामुळे तुमची कोरडी त्वचा मऊ होते आणि चमकदार होण्यास मदत होते.

कच्च्या दुधाला एक नैसर्गिक क्लीन्झर मानले जाते. कापसाच्या बोळ्याने संपूर्ण चेहऱ्यावर कच्चे दूध लावा आणि चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातील आणि तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ होईल.

ज्यांच्या चेहऱ्यावर खूप डाग आणि वारंवार येणारे मुरुम आहेत, त्यांच्यासाठी कच्चे दूध खूप फायदेशीर ठरू शकते. कच्चे दूध लावल्याने तुमच्या त्वचेवरील डाग कमी होतील आणि टॅनिंग कमी होण्यासही मदत होईल. ते 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

कच्चे दूध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे त्वचा उजळ करण्यास मदत करतात. जर तुमच्याही त्वचेवर काळे डाग असतील, त्वचा सुरकुतली असेल किंवा ड्राय पडली असेल तर तुम्ही कच्चे दूध लावू शकता.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts