Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • निवडणूकीत अघोरी प्रकार, उमेदवारांच्या फोटाला सुया, दाभण टोचून जादूटोणा
Top News

निवडणूकीत अघोरी प्रकार, उमेदवारांच्या फोटाला सुया, दाभण टोचून जादूटोणा

Black magic on candidate's photo

Black Magic : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा प्रचार आज संपत आहे. रात्री 10 वाजता प्रचार बंद होणार असून दिवसभर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सभा पार पडल्या आहेत. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपरिषद निवडणुकीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता या निवडणूकीला अंधश्रधेचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परंडा येथे जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारांचा आणि त्यांच्या समर्थक नेत्यांचा जादूटोण्यात वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील एका प्रार्थनास्थळात या उमेदवारांचे फोटो सुई आणि दाभण टोचून काळ्या कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेले आढळले. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. परांडा पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार सुरू होता.

नगर परिषदांच्या निवडणुका अचानक स्थगित! कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी केली मोठी मागणी

या प्रकरणावर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, आमच्या फोटोला कितीही सुई टोचल्या तरी काही फरक पडणार नाही. जनता तुमच्या त्रासाला कंटाळली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, असा प्रकार कोण करतो हे ठरवून करावे लागते. याची चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विकासाच्या मुद्द्याऐवजी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

जादूटोण्याच्या प्रकारामुळे वातावरण अधिक तापलं

परंडा नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची शिवसेना आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर दोन्ही पक्षांचा जोरदार प्रचार सुरू होता. मात्र समोर आलेल्या या जादूटोण्याच्या प्रकारामुळे वातावरण अधिकच तंग झाले आहे. या घटनेबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही, मात्र पोलिसांकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts