Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “हमरीतुमरीची गरज नाही…”, काँग्रेसच्या निर्णयानंतर छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये, बारामतीत राजकीय हालचाली वेगात
Top News

“हमरीतुमरीची गरज नाही…”, काँग्रेसच्या निर्णयानंतर छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये, बारामतीत राजकीय हालचाली वेगात

Chhagan Bhujbal | सध्या बारामतीमध्ये (Baramati) राजकीय हालाचाली वेगात सुरू आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक (Baramati By Election) जाहीर करण्यात आली आहे. तर आज या निवडणुकासाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज त्या आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकासाठी काँग्रेसने (Congress) देखील आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – लढणार की माघार घेणार? बारामती पोटनिवडणूकीबाबत लक्ष्मण हाकेंची भूमिका स्पष्ट

बारामती पोटनिवडणुकीबाबत काय म्हणाले छगन भुजबळ?

बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं म्हणत छगन भुजबळ हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नुकतीच छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, आज आम्ही सर्वजण सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. सुनेत्रा ताईंनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन केलं आहे.

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही अनेक राजकीय नेत्यांसोबत चर्चा केली आहे. आम्ही एकनाथ शिंदे, रामदास आठवले, महादेव जानकर यांच्यासोबत चर्चा केली आहे. तसेच आम्ही राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांसोबतही बोलण्याचा प्रयत्न केला आहे. जयराम रमेश यांच्यासोबत आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. तर मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तर वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यावेळी तिथे सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. आम्ही आधीच जाहीर केलं होतं, आम्ही या निवडणुकीसाठी उमेदवार देणार नाही, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

काँग्रेसबाबत काय म्हणाले भुजबळ?

पुढे ते म्हणाले की, आज आपल्यासोबत अजित पावर नाहीयेत, त्यामुळे या कठीण परिस्थितीत ही निवडणूक लढवावी लागत आहे. जरी प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असले तरी लोकशाहीत विनंती करण्याचा अधिकार सर्वांना असतो. राजकीय कटुता टाळण्यासाठी हमरीतुमरीची गरज नाही. तसेच जरी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही काँग्रससोबत लवकरच चर्चा करू, असंही छगन भुजबळ म्हणाले.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts