• Home
  • राजकारण
  • बारामतीत मोठा राजकीय ट्विस्ट! काँग्रेस उमेदवाराने घेतली शरद पवारांची भेट, आता काय ठरलं?
Top News

बारामतीत मोठा राजकीय ट्विस्ट! काँग्रेस उमेदवाराने घेतली शरद पवारांची भेट, आता काय ठरलं?

pawar 4

Baramati Byelection | सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते बारामती पोटनिवडणुकीकडे (Baramati Byelection). बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून (Mahayuti) मोठे प्रयत्न केले जात आहे. मात्र, काँग्रेसचे (Congress) उमेदवार आकाश मोरे (Akash More) यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याच्यं स्पष्ट झालं आहे. तर आता ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार रोहित पवारही (Rohit Pawar) प्रयत्न करताना दिसत आहे.

हेही वाचा – “तुमचा भाऊ मरेल…”, भीती दाखवून जाळ्यात अडकवलं; खरात अन् त्याच्या पत्नीने मिळून एका कुटुंबाला लुबाडलं, झाला मोठा पर्दाफाश

काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे उमेदवारी अर्ज मागे घेणार?

बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध होण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करत त्यांच्याशी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे शरद पवारांच्या भेट घेण्यासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून या दिवशी आकाश मोरे हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आकाश मोरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? असा सवाल सध्या निर्माण केला जात आहे.

दुसरीकडे रोहित पवारांनी आज सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. तसेच रोहित पवारांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत देखील चर्चा केली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे. आज बारामती पोटनिवडणुकासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर या निवडणुकीत काँग्रेसने आणि अपक्ष 53 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आजच्या दिवशी हे सर्व उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार हा? असा सवाल सध्या निर्माण केला जात आहे.

या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बारामतीसाठी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या काँग्रेस पक्ष नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सध्या काँग्रेसची भूमिका ही तळ्यातमळ्यात असल्याचं दिसत आहे. एकिकडे रोहित पवारांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा केली आहे. तर दुसरीकडे आकाश मोरेंनी शरद पवारांनी भेट घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेस या निवडणुकीतून माघार घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच पक्ष श्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर आम्ही पुढील भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती आकाश मोरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts