Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बिहारमध्ये राजकीय खळबळ! निशांत कुमार यांची जेडीयूमध्ये एन्ट्री; वडील नितीश कुमार यांच्याबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Top News

बिहारमध्ये राजकीय खळबळ! निशांत कुमार यांची जेडीयूमध्ये एन्ट्री; वडील नितीश कुमार यांच्याबाबत केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Nishant Kumar Joins JDU | नुकतीच बिहारच्या (Bihar) राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांचे पुत्र निशांत कुमार (Nishant Kumar) यांनी आज जनता दल युनायटेड (JDU) पक्षात प्रवेश केला आहे. निशांत कुमार यांनी पाटणा येथील जेडीयू कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. यावेळी श्रवण कुमार (Shravan Kumar), विजय चौधरी (Vijay Chaudhari), संजय झा (Sanjay Jha) आणि लल्लन सिंह (Lallan Singh) यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

हेही वाचा – पुण्यातील उड्डाणपुलाला अजित पवारांचे नाव देणार? सुनेत्रा पवार भावूक, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धाडसी निर्णय…

निशांत कुमार यांनी आज जेडीयूमध्ये प्रवेश केला. मात्र, त्यांच्या पक्ष प्रवेशादरम्यान नितीश कुमार हे उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे, पक्षात प्रवेश केल्यानंतर निशांत कुमार यांनी वडील नितीश कुमार यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पक्षात प्रवेश केल्यानंतर काय म्हणाले निशांत कुमार?

जेडीयू पक्षात प्रवेश केल्यानंतर निशांत कुमार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, येथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही सर्वांनी आज येथे येऊन तुमचा मौलव्यान वेळ आम्हाला दिला आहे. मी तुमचे आभार मानतो आणि स्वागतही करतो. मी आज जेडीयू पक्ष कार्यालयात जेडीयूचे सदस्यत्व घेण्यासाठी आलो आहे. तसेच मी सक्रिय सदस्य म्हणून पक्षात काम करेन आणि पक्षाची काळजी घेण्याचा प्रयत्न करेन, असं निशांत कुमार म्हणाले.

पुढे नितीश कुमार यांच्याबाबत निशांत कुमार यांनी भाष्य केलं. माझ्या वडिलांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला असून हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्यांनी घेतलेला निर्णयाचा स्वीकार करतो. आम्ही सर्व नेतेमंडळी वडील नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. तसेच माझ्यावर पक्षाने आणि जनतेनी जो विश्वास ठेवला आहे तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन नितीश कुमार यांनी दिले.

नितीश कुमार यांच्याबाबत काय म्हणाले निशांत कुमार?

माझ्या वडिलांनी 20 वर्षांमध्ये जे काम केले आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. लोकांच्या हृदयात स्वत:साठी स्थान निर्माण करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षाला बळकट करण्याचा प्रयत्न करेन. तसेच संपूर्ण देशाला माझे वडील नितीश कुमार यांचा अभिमान आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझे वडील नितीश कुमार यांच्यावर असलेला विश्वास कायम ठेवावा, असंही निशांत कुमार म्हणाले.

दरम्यान, एकिकडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत प्रवेश करणार असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र निशांत कुमार हे जेडीयू पक्षात सामील झाले आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts