Congress MP Prashant Padole Accident | नुकताच मोठा भीषण अपघात (Accident) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) नेते आणि भंडारा गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. भंडाऱ्यावरून (Bhandara) नागपूरला (Nagpur) जात असताना प्रशांत पडोळे यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की पडोळे यांच्या फॉर्च्युनर कारचा चक्काचुर झाला आहे.
हेही वाचा – रूपाली चाकणकर पुन्हा अडचणीत; रायगड कनेक्शनचा झाला खुलासा, नेमकं प्रकरण काय?
नेमका अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारचा मोठा अपघात झाला आहे. आज सकाळी प्रशांत पडोळे हे भंडाऱ्यावरून नागपूरला जात होते. यावेळी त्यांच्या फॉर्च्युनर कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात नागपूरजवळील हल्दीरामसमोर घडला आहे. या अपघातात पडोळे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. तर या अधिवेशनाला जाण्यासाठी प्रशांत पडोळे नागपुरकडे निघाले होते. यादरम्यान समोरील एका ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने खासदार पडोळेंची कार ट्रकवर जाऊन जोरात आदळली. यामध्ये त्यांच्या कारचा चक्काचूर झाला. या भीषण अपघात अपघातादरम्यान कारमध्ये प्रशांत पडोळे, चालक राहुल गिरीपुंजे, बॉडीगार्ड खडसे आणि देवेंद्र शहारे हे व्यक्ती होते. तर या अपघातात खासदार पडोळे आणि देवेंद्र शहारे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर या दोघांना तातडीनं खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तर संबंधित परिसरातील लोकांनी अपघात घडल्यानंतर मदतीसाठी तातडीनं धाव घेतली होती. तर आता या अपघाताची नोंद वडोदा येथील पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. तसेच सध्या देवेंद्र शहारे यांच्यावर वडोदा येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर खासदार पडोळे हे उपचार घेऊन विमानाने दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, भंडारा नागपूर या महार्मागावर सातत्याने अपघात होण्याचं सत्र सुरू आहे. या महामार्गावर वारंवार ट्रक अपघात होत असल्यामुळे लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.












