Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • लाडक्या बहि‍णींना आनंदाची बातमी; सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या, लवकर या…
Top News

लाडक्या बहि‍णींना आनंदाची बातमी; सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा, म्हणाल्या, लवकर या…

Deputy CM Sunetra Pawar Big Announcement | लाडक्या बहि‍णींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिला कर्मचाऱ्यांना गर्दीच्या वेळी होणारा त्रास सहन करावा लागतो म्हणून हा त्रास कमी करण्यासाठी राज्य सरकरानं नवीन योजना अंमलात आणली आहे. तर आज या नवीन योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केली आहे.

हेही वाचा – लोकप्रिय रील स्टार अरूण तुपेचं आकस्मिक निधन; राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ, चाहत्यांना मोठा धक्का

राज्य सरकारनं कोणती नवीन योजना आणली?

‘लवकर या, लवकर जा’ ही नवीन योजना सरकारनं अंमलात आणली असून याबाबतची मोठी घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सुनेत्रा पवारांनी विधान परिषदेत या योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सरकारनं आणली आहे.

आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत आपले पहिले निवेदन दिले. यादरम्यान त्यांनी ‘लवकर या, लवकर जा’ या नवीन योजनेची घोषणा केली. यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दररोज सकाळी लवकर कामावर येताना सरकारी महिला कर्मचाऱ्यांना गर्दी असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या योजनेनुसार आता मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी सकाळी 9.15 वाजता कार्यालय सुरू होणार आहे. 9.15 ते 9.45 या दरम्यान महिला कर्मचारी कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकी मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची, अर्थातच सुमारे 30 मिनिटांची सवलत देण्यात आली आहे , अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. महिला कर्मचाऱ्यांना कामावर येताना गर्दीचा त्रास सहन करावा लागतो म्हणून सरकारने ही नवनी योजना आणली आहे.

राज्य सरकारने अंमलात आणलेल्या ‘लवकर या, लवकर जा’ या योजनेमुळे राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या योजनेसोबतच सुनेत्रा पवारांनी लाडकी बहीण योजना, महिलांच्या प्रसूती रजा, अंगणवाडीमधील पाण्याची समस्या आणि शक्ती कायद्याबाबतही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

सुनेत्रा पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. तसेच आता राज्य सरकार लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली.

महिलांना किती दिवसांची प्रसूती रजा मिळणार?

तसेच प्रसूती महिलांच्या रजेबाबतही सुनेत्रा पवारांनी महत्त्वाची घोषणा केली. महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली. सोबतच अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. तर आता प्रत्येक अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. तर राज्यात शक्ती कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts