Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • बाॅलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Top News

बाॅलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेद्र यांचे निधन, ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dharmendra Death

बाॅलीवूडचा ‘ही-मॅन’ ओळख असलेला अभिनेता धमेंद्र यांनी आज ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी जवळपास 6 दशकापासून बाॅलीवूडमध्ये आपली कारकिर्द बजावली आहे. 1960 मध्ये त्यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बाॅलीवूड मध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक यशाचे शिखर गाठलं. अन् सिनेप्रेमींमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळी छबी तयार केली. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य जागवणारा कोहिनूर हिरा हरपल्याने बाॅलिवूडमध्ये मोठी मोकळी निर्माण होणार आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच अख्खं बाॅलिवूड शोकसागरात आहे.

धर्मेंद्र यांची ६५ वर्षांची कारकीर्द

त्यांनी 1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1961 मध्ये आलेल्या “बॉय फ्रेंड” या चित्रपटात ते सहाय्यक भूमिकेत दिसले. धर्मेंद्र 65 वर्षे अभिनयात सक्रिय राहिले, त्यांनी असंख्य हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973), और यादों की बारात (1973) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचा – बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड; २७६ चित्रपटातून निर्माण केली स्वत:ची ओळख

धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट

धर्मेंद्र ८९ व्या वर्षीही सतत काम करत होते. त्यांच्या निधनानंतर, त्यांचा शेवटचा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ते ‘‘इक्किस’’ या चित्रपटात दिसतील. या चित्रपटात ते अगस्त्य नंदाच्या वडिलांची भूमिका साकारतील. हा चित्रपट २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

धर्मेंद्र यांचे वैयक्तिक जीवन

धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी दोनदा लग्न केलं. त्यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले. या लग्नापासून त्यांना चार मुले आहेत: सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल. त्यांचं दुसरं लग्न अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी झालं. प्रकाश यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट दिला नाही, म्हणून धर्मेंद्र यांनी दुसरा धर्म स्वीकारला आणि पुन्हा लग्न केलं. हेमा मालिनीपासून त्यांना दोन मुली आहेत: ईशा देओल आणि अहाना देओल.

धर्मेंद्र यांना मिळालेले पुरस्कार

धर्मेंद्र यांनी मिळालेल्या प्रमुख पुरस्कारांमध्ये 1997 चा फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि 2012 चा पद्दभूषण पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळवले आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts