Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क ₹10 ने कमी; इंधन स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन दर
Top News

मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क ₹10 ने कमी; इंधन स्वस्त होणार का? जाणून घ्या नवीन दर

Petrol-Diesel Prices | सध्या मध्य पूर्वेत जोरदार युद्ध सुरू असल्यामुळे अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये तणावाचे वातावरण असून युद्ध (War) थांबायचे नाव घेत नाहीये. या युद्धामुळे काही देशांना आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे. कारण इराणने आक्रमक होत होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामुद्रधुनीचा मार्ग बंद करण्यात आल्यामुळे त्यामध्ये अनेक तेलाचे, गॅसचे टँकर असलेले जहाज अडकून पडले आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेल, गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसत आहे. अशातच आता जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – होर्मुज सामुद्रधुनी बंद करणाऱ्या इराणच्या IRGC नौदल प्रमुखाचा मृत्यू; इस्रायलचा मोठा दावा

सरकारने पेट्रोल-डिझेलच्या शुल्कात कपात करण्याचा घेतला मोठा निर्णय

सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. आज (27 मार्च) सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींवरील शुल्कात प्रति लिटर 10 रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज पेट्रोल-डिझेलच्या शुल्कात प्रति लिटर 10 रूपयांची कपात झाली आहे. यामध्ये पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 3 रूपयांपर्यंत कमी करण्यात आले असून डिझेलवरील शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आले आहे.

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. तर या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल-डिझेलच्या शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे दर सरकारने कमी केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जागतिक कच्च्या तेलाचा आणि वायूचा सुमारे 20 टक्के पुरवठा केला जातो, जो 20 ते 25 दशलक्ष बॅरल इतका असतो. तर भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. कारण भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजांपैकी सुमारे 12 ते 15 टक्के गरज या सामुद्रधुनीतून करत असे.

दरम्यान,  28 फेब्रुवारी 2026 ला इस्राईल आणि अमेरिका या देशांनी संयुक्त कारवाई करत इराणवर मोठा हल्ला केला. त्यामुळे इराणनेही त्याला प्रत्युत्तर दिले. परिणामी हे युद्ध आणखीनच भडकले. या युद्धादरम्यान इराणने होर्मुज खाडी बंद करत अनेक देशांना धक्का दिला. त्यामुळे अनेक देशात अभूतपूर्व इंधन टंचाई निर्माण झाली. त्याचा सार्वधिक फटका भारताला बसला. सध्याच्या घडीला भारताचे 20 तेलवाहू जहाज होर्मुज खाडीत अडकली आहेत.

होर्मुज खाडीतून जाण्यासाठी जहाजांना इराणच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क करूनच जावे लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जहाजांना इराणच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करावी लागेल. सुरक्षित मार्ग नक्की कोणता हे इराणचे अधिकारी जहाजांना सांगतील. इराणच्या या निर्णयाने कच्चे तेल आणि गॅसची समस्या दूर होऊ शकते. यासोबतच जागतिक बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमतीही कमी होऊ शकतात.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts