Four airports will remain closed : जगाची सफर करत असाल तर थांबा. नाहीतर तुम्हाला डोक्याला हात लावावा लागेल. इराण-इस्राईल व अमेरिका युद्ध (iran-israiel-america war) सुरु असताना देशातील चार विमानतळे (airport) काही कालावधीसाठी का बंद करण्यात आली आहेत, ते थोडक्यात जाणून घेऊ या. यामध्ये जोधूपूर, श्रीनगर, पुणे, अहदमपूर एअर बेस या विमानतळांचा समावेश आहे. रनवे रिपेअर (Runway Repair) करण्यासाठी ही चार विमानतळ काही काळासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेणयात आला आहे. त्यामुळेच आगामी काही दिवसांत तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर या अपडेट लक्षात ठेवूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले जात आहे.
हे ही वाचा: पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी; सिंधू जल करारावरून भारताने फटकारलं
प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी तिकीट बुकिंग थांबवले
जोधपूर विमानतळ २९ मार्च ते२७ एप्रिल या काळात साधारण एका महिन्यासाठी बंद असेल. या विमानतळावरून कोणतेही विमानोड्डाण होणार नाही. हीच बाब लक्षात घेऊन इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी २८ मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे. दुसरीकडे श्रीनगर विमानतळावरील काही फ्लाईट्स या ऑगस्टपासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत वीकएंडपर्यंत चालू असतील. त्यानंतर १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत हे विमानळ पूर्णपणे बंद असेल.
पुण्याच्या विमानतळाच्या रनवेची डागडुगी होणार
दुसरीकडे पुण्याच्या विमानतळावरील रनवेची डागडुगी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ही डागडुजी नेमकी कधी होईल, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. तर आदमूपर एअरबेस या वर्षाच्या शेवटी साधारण आठ महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लष्करासाठी खूप महत्त्वाची विमानतळे
ही विमानतळे सीमाभागात असल्याने लष्करासाठी खूप महत्त्वाची आहेत. या विमानतळांवरील रनवेवर फायटर जेट तसेच अन्य संरक्षणविषयक उड्डाणे होतात. सैन्याच्या विमानांच्या उड्डाणासाठी तेथील रनवे अनुकूल असणे गरजेचे असते. त्यामुळेच या विमानतळांच्या रनवेची डागडुजी वेळेवर केली जाते. या काळात विमानांचे मार्ग बदलले जातात. विमान प्रवासा उशिराने होतो.












