Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • दरबार ते घरपोच भेट! एका व्हिजिटसाठी भोंदू खरात किती पैसे घेत होता? झाला धक्कादायक खुलासा
Top News

दरबार ते घरपोच भेट! एका व्हिजिटसाठी भोंदू खरात किती पैसे घेत होता? झाला धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदू ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अशोत खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. अशोक खरातने महिलांसह अनेक पुरूषांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. त्यामुळे याप्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा – जगात खळबळ! अमेरिकेचा इराणवर हल्ला; इस्फहानवर टाकले बंकर-बस्टर बॉम्ब, ट्रम्प यांनी धक्कादायक व्हिडीओ केला शेअर

एका व्हिजीटसाठी अशोक खरात किती फी घ्यायचा?

सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. विशेष तपास पथकानं खरातच्या कार्यालयावर धाड टाकली होती. या तपासात अनेक पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. खरातच्या कार्यालयात एक वही, काळे पेढे, काळी फळे आणि संशयास्पद काही यंत्रही सापडली आहेत. तर आता अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे.

अशोक खरातच्या भक्तगणांमध्ये अनेक राजकीय नेते, उद्योगपती, बडे सरकारी अधिकारी यांचा समावेश होता. तर खरातचे जे भक्त होते ते बऱ्यापैकी श्रीमंत आणि आर्थिकदृष्टा सुस्थितील होते. त्यामुळे काही भक्त हे खरातला आपल्या घरी बोलवत होते. खरात या भक्तांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करायचा. तर या व्हिजीटसाठी खरात नेमके किती पैसे घ्यायचा याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.

बऱ्याच भक्तांच्या घरी अशोक खरात व्हिजीटसाठी जात होता. या व्हिजीटदरम्यान तो भक्तांची मोठ्या प्रमाणात लूट करायचा. जर आऊट डोअर व्हिजीट असेल तर खरात संबंधित लोकांकडून तब्बल 5 लाख रूपये एवढी फी घ्यायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बऱ्याच लोकांना खरातचा सल्ला, त्याचे मार्गदर्शन हवे असायचे. त्यामुळे काही लोकं त्याला आपल्या घरी व्हिजीटसाठी बोलवत असत. तर काही लोकं आपल्या व्यावसायाच्या ठिकाणी देखील खरातला बोलवत होते. तर व्हिजीटसाठी जाण्यासाठी खरात अशा लोकांकडून 5 लाख रूपये फी घ्यायचा.

पुण्यातील एकाला खरातने घातला लाखोंचा गंडा

पुण्यात अशाच एका भक्ताला खरातने लाखोंचा गंडा घातला होता. पूजा करण्यासाठी तुमची गाडी हवी आहे असं सांगून एका भक्ताला खरातने 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला सांगितली होती. त्यानंतर ती कार खरातने आपल्या स्वत:च्या नावावर करून घेतली होती, अशी माहिती देखील आता समोर आली आहे. अशाप्रकारे खरात लोकांना लाखोंचा गंडा घालत होता.

दरम्यान, उद्या अशोक खरातला न्यायालयात सादर केलं जाणार आहे. विशेष तपास पथकानं या प्रकरणाचा कसून तपास केला असून उद्या ते कोर्टात सर्व पुरावे सादर करणार आहेत. यानंतर ढोंगीबाबा अशोक खरात प्रकरणी कोर्ट काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts