Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • HPCL Recruitment 2026: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि निवड प्रक्रिया
Top News

HPCL Recruitment 2026: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदांसाठी मेगा भरती सुरू; जाणून घ्या पगार आणि निवड प्रक्रिया

Eligibility Criteria for HPCL Jobs: तुमचंही शिक्षण पूर्ण झालं आणि नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी बातमी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी खालील दिलेल्या वेबसाईटवर जाणून अधिक माहिती पाहू शकता.

सरकारी ऊर्जा क्षेत्रातील प्रमुख कंपनी (HPCL) ने तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट आणि तांत्रिक क्षेत्रातील विविध पदांसाठी ७३१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. याभरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही 25 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून 25 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी HPCL अधिकृत वेबसाइट https://www.hindustanpetroleum.com/ वर जाऊन अर्ज करू शकतात.

पदांची माहिती

HPCL ने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे एकूण 731 पदे भरण्यात येणार आहेत. यात:

ज्युनियर एग्झिक्युटिव्ह

मेकॅनिकल इंजिनिअर

इलेक्ट्रिकल इंजिनिअर

केमिकल इंजिनिअर

ऑफिसर

सीनियर स्तराचे पद

यांचा समावेश आहे.

Oil Free Puri Recipe: एक थेंबही तेल न वापरता बनवा मऊ-लुसलुशीत पुऱ्या, लगेच नोट करा ‘ही’ सोपी रेसिपी

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या पदांसाठी इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.hindustanpetroleum.com/ वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 25 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झाली असून 25 मार्च 2026 पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. यात समावेश आहे:

3 वर्षांची पदवी

फुल टाइम डिप्लोमा

इंजिनिअरिंग पदवी

सायन्स ग्रॅज्युएट + फायर अँड सेफ्टी डिप्लोमा

MBA

चार्टर्ड अकाउंटंट, कोस्ट अकाउंटंट

लॉ ग्रॅज्युएशन

इतर संबंधित डिग्र्या

काही पदांसाठी कामाचा अनुभव देखील आवश्यक आहे.

वय आणि पगार

अर्ज करण्यासाठी अधिकतम वयाची सीमा 25 ते 43 वर्ष आहे, पदानुसार.

काही पदांवर सुरुवातीचा पगार 30,000 ते 2,80,000 रुपये प्रति महिना

उच्च पदांसाठी, जसे की सीनियर सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजिस्ट, वार्षिक पॅकेज 50 ते 60 लाख रुपये

निवड प्रक्रिया

लिखित परीक्षा किंवा कंप्यूटर आधारित टेस्ट

ग्रुप टास्क

इंटरव्ह्यू

अर्ज करण्याची प्रक्रिया

HPCL अधिकृत वेबसाइट https://www.hindustanpetroleum.com/ वर जा.

Our Current Openings विभागात जाऊन Recruitment of Officers 2026 लिंकवर क्लिक करा.

बेसिक माहिती भरा – नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, वर्ग, लिंग, पत्ता इत्यादी.

पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन कॉपी अपलोड करा.

वर्गानुसार अर्ज फी ऑनलाइन भरा आणि फॉर्म सबमिट करा.

भरतीसंबंधी अधिक माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts