Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • NEET UG 2026: नीट यूजी फॉर्ममध्ये चूक झाली? ‘या’ सोप्या स्टेप्सने आजपासून करा अर्ज दुरुस्ती
Mumbai

NEET UG 2026: नीट यूजी फॉर्ममध्ये चूक झाली? ‘या’ सोप्या स्टेप्सने आजपासून करा अर्ज दुरुस्ती

Neet Ug 2026 exam

NEET UG Correction Window 2026: तुम्ही देखील नीट युजी (NEET UG 2026)चा फॉर्म भरला आहे आणि त्यात काही चुका लक्षात आल्या आहेत का? काळजी करू नका. आजपासून (१२ मार्च २०२६) सुधारणा विंडो उघडली आहे. या सोपेय स्टेप्स वापरून तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता. चला, पाहूया कसा करावा हा प्रोसेस.

नीट युजी ही परीक्षा मेडिकल क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी दिली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. जर तुमचं देखील स्वप्न डॉक्टर होण्याचे असेल आणि नीट युजीचा अर्ज भरला आहे. पण त्यात काही चुका आढळून आल्या असतील तर घाबरू नका. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA)ने आज १२ मार्च २०२६ पासून अर्ज सुधारण्याची सुविधा सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले फॉर्म तपासून आवश्यक ते बदल करू शकतात.

हेही वाचा:

सुधारणा विंडोची माहिती

NTA 12 मार्च दुपारी १२ वाजल्यापासून NEET UG 2026 Correction Window सुरू झाली आहे. उमेदवारांना फक्त एकदाच सुधारणा करण्याची संधी दिली. आणि 14 मार्च 2026 रात्री 11:50 वाजेपर्यंत हे करता येणार आहे. जर बदलामुळे अर्ज शुल्कात फरक पडत असेल, तर अतिरिक्त फी भरणे आवश्यक आहे. सर्व बदल सबमिट झाल्यानंतर फॉर्म लॉक होईल, आणि नंतर कोणताही बदल करता येणार नाही.

कोणत्या माहितीमध्ये बदल करता येईल?

सुधारणा विंडो दरम्यान खालील माहितीमध्ये सुधारणा करता येईल:

पालकांची माहिती:

वडिलांचे नाव, शिक्षण व व्यवसाय

किंवा आईचे नाव, शिक्षण व व्यवसाय

शैक्षणिक आणि इतर माहिती:

10वी व 12वीचे अकॅडमिक तपशील

कॅटेगरी / सब-कॅटेगरी / PwD स्टेटस

NEET UG प्रयत्नांची संख्या

स्वाक्षरी

पत्ता व परीक्षा संबंधित माहिती:

परीक्षा शहर (Examination City)

परीक्षा भाषा

ओळखपत्राची माहिती:

जे उमेदवार आधार कार्ड शिवाय इतर ओळखपत्राने नोंदणी केले आहेत, ते त्यांचे तपशील सुधारू शकतात

हेल्पलाइन

तांत्रिक अडचणी आल्यास संपर्क करा:

011-40759000

011-69227700

फॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी हे स्टेप्स वापरा

neet.nta.nic.in या वेबसाइटला भेट द्या

होमपेजवरील “NEET UG 2026 Correction Window” लिंक क्लिक करा

अॅप्लिकेशन नंबर व पासवर्ड टाकून लॉग-इन करा

फॉर्म तपासा आणि आवश्यक बदल करा

बदलांची पुन्हा तपासणी करा आणि Submit क्लिक करा

कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून सुरक्षित ठेवा

NEET UG 2026 परीक्षा

परीक्षा 3 मे 2026 रोजी पेन-पेपर मोडमध्ये होईल. यंदाही लाखो विद्यार्थी MBBS, BDS, AYUSH आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी परीक्षा देतील.

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts