Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षार्थींना गळ्यातील मंगळसूत्र काढण्याच्या सूचना, महिला उमेदवारांची तारांबळ
Top News

संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षार्थींना गळ्यातील मंगळसूत्र काढण्याच्या सूचना, महिला उमेदवारांची तारांबळ

instructed to remove their mangalsutra

Female candidates are in a frenzy : आज राज्यासह देशभरात केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) परीक्षा सुरू आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar CTET Examination Center) येथील महिला उमेदपारांना वेगळीच परीक्षा द्यावी लागत आहे. परीक्षा केंद्रात आत जाताना महिलांना चक्क मंगळसूत्र काढून (Instructions for removing the mangalsutra) जावे लागले आहे. आज सकाळी ९:३० ते १२:३० यावेळेत परीक्षा आहे. त्यापूर्वी सकाळी ८ वाजता रिपोर्टिंग टाईम असताना प्रत्येक परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात (Candidate Examination Center) जाताना कसून चौकशी केली जात होती. यात कुठलेही मेटलच साहित्य सोबत घेऊन जाऊ नका, असे गेटवरच सांगण्यात आले. मात्र, ऐनवेळी गळ्यातील मंगळसूत्र काढण्याच्या सूचनांमुळे महिला उमेदवारांची तारांबळ (Female candidates are in a frenzy) उडाल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – पद्मालय जंगल हत्याकांड : प्रियसी तृतीयपंथी असल्याचं समजल आणि प्रियकराने हत्या करून दिली कबुली

महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कानातले-नाकातले दागिने काढण्याच्या सूचना केल्या. त्याशिवाय परीक्षेला जाता येणार नाही, असं परीक्षा नियोजकांकडून सांगितले गेले. त्यामुळं मंगळसूत्रासह अंगावरची सगळी दागिने काढावे लागले. छत्रपती संभाजीनगर शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. त्यामुळे अनेक महिलांची परीक्षा केंद्रावर जाताना अडचण झाली. काहींच्या सोबत नातेवाईक होते त्यांनी नातेवाईकांकडे अंगावरील सोनं दिलं. मंगळसूत्र दिले. मात्र, ज्यांच्यासोबत कोणीही नाही त्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

नेमका काय प्रकार घडला?

आज सकाळी 9.30 ते दुपारी 12 या वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, परीक्षार्थींना सकाळीच सात वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. रिपोर्टिंग टाईमपासूनच सुरक्षा तपासणी अत्यंत कडक करण्यात आली होती. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर कुठलेही धातूचे साहित्य सोबत नेण्यास मनाई असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात येत होतं. या नियमांची अंमलबजावणी करताना अनेक ठिकाणी महिलांना गळ्यातील मंगळसूत्र, कानातील व नाकातील दागिने काढूनच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यास सांगण्यात आलं. मंगळसूत्रसह कोणतेही दागिने घातलेले असतील, तर परीक्षा देऊ दिली जाणार नाही, अशी सूचना काही केंद्रांवर देण्यात आली. त्यामुळे अनेक महिला परीक्षार्थी गोंधळून गेल्या.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts