Iran US Israel War | गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल (Israel), अमेरिका (US) आणि इराण (Iran) या तिन्ही देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर मोठा हल्ला केला होता. तर त्याला प्रत्युत्तर देत इराणने देखील मिसाईल, ड्रोन डागत मोठा प्रतिहार केला होता. त्यामुळे हे युद्ध चांगचंल भडकलं होतं. अशातच आता हे युद्ध थांबवण्यासाठी इराणने जगासमोर तीन अटी ठेवल्या आहेत.
इराणने अमेरिका आणि इस्त्रायलसोबतचे युद्ध थांबवण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. याबाबतची माहिती इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी दिली आहे. मसूद पेझेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर इराणच्या तीन अटींबाबत माहिती दिली आहे.
इराणने कोणत्या तीन अटी घातल्या?
मसूद पेझेश्कियान म्हणाले की, जर युद्ध थांबवायचं असेल तर खालील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे.
1. कायदेशी अधिकारांनी मान्यता- इराणच्या कायदेशीर अधिकारांचा आणि सार्वभौमत्वाचा स्वीकार करणे.
2. नुकसानभरपाई देणे – या युद्धामुळे इराणचे जे काही नुकसान झाले आहे त्याची भरपाई इस्त्रायल आणि अमेरिका या देशांनी द्यावी.
3. आंतरराष्ट्रीय हमी – भविष्यात इराणवर कोणताही हल्ला होणार नाही याची ठोस हमी आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात यावी.
या तीन अटी इराणने अमेरिका आणि इस्त्रायल या देशांना घातल्या आहेत. तसेच अमेरिकेने आणि झिओनिस्ट राजवट (इस्त्रायल) हे युद्ध पेटवले आहेत आणि आता हे युद्ध संपवायचे असेल तर आमच्या अटी मान्य करणं हाच एकमेव मार्ग आहे, असं पेझेश्कियान यांनी म्हटलं आहे.
Talking to leaders of Russia and Pakistan, I reaffirmed Iran’s commitment to peace in the region. The only way to end this war—ignited by the Zionist regime & US—is recognizing Iran’s legitimate rights, payment of reparations, and firm int’l guarantees against future aggression.
— Masoud Pezeshkian (@drpezeshkian) March 11, 2026
एकिकडे अटी तर दुसरीकडे इशारा, इराणचं नेमकं चाललंय काय?
एकिकडे इराणने युद्ध थांबवण्यासाठी अटी घातल्या असताना दुसरीकडे इराणच्या सशस्त्र दलाचे प्रवक्ते अबोलफजल शेकरची यांनी गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेने जर बंदरांना लक्ष्य केले तर पार्शियन गल्फमधील कोणतेही बंदर आमच्या कक्षेबाहेर नसेल. तेव्हा आम्ही अधिक भीषण हल्ला करू, असा इशारा शेकरची यांनी दिला आहे. त्यामुळे नेमके हे युद्ध थांबणार की पेटणार? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, युद्ध थांबवण्यासाठी इराणने त्यांच्या तीन अटी अमेरिकेला आणि इस्त्रायलला घातल्या आहेत. तर आता अमेरिका आणि इस्त्रायल इराणच्या अटी मान्य करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.












