Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • कमर्शियल गॅस टंचाईमुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की उद्योग अडचणीत; उत्पादन बंद लाखोंची उलाढाल ठप्प?
ताज्या बातम्या

कमर्शियल गॅस टंचाईमुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की उद्योग अडचणीत; उत्पादन बंद लाखोंची उलाढाल ठप्प?

Chikki industry in trouble

Chikki industry in trouble : कमर्शियल गॅसच्या तीव्र टंचाईमुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध चिक्की व्यवसाय सध्या बंद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सध्या केवळ पुढील दोन दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उपलब्ध असल्याची माहिती मगनलाल चिक्कीचे संचालक मंगेश अग्रवाल यांनी दिली आहे.

हेही वाचा – भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलीचं आकस्मिक निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे चिक्की उत्पादन पूर्णपणे ठप्प

चिक्की तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गॅसची आवश्यकता असते आणि संपूर्ण उत्पादन प्रक्रिया त्यावरच अवलंबून असते. मात्र गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे चिक्की उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोणावळ्यातील अनेक चिक्की उत्पादक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

चिक्की व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल

दरम्यान, सुरू असलेल्या जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने त्याचे परिणाम स्थानिक उद्योगांवरही दिसून येत आहेत. लोणावळा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण असून येथे चिक्की हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. या व्यवसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

मात्र गॅस टंचाई कायम राहिल्यास चिक्की उत्पादन पूर्णपणे बंद पडून लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी राज्य शासनाने तातडीने कमर्शियल गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts