Akshay Kumar And Twinkle Khanna | मागील काही दिवसांपासून इराण (Iran), इस्त्रायल (Israel) आणि अमेरिका (US) या देशांमधील युद्ध (War) जोरदार पेटले आहे. अमेरिका-इस्त्रायलने मिळून इराणवर हल्ला केला होता, ज्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आक्रमक झालेल्या इराणने होर्मुझची सामु्द्रधुनी बंद केली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी (Hormuz Strait) बंद केल्यामुळे अनेक देशांचे तेलाचे, गॅसचे टँकर अडकून पडले आहेत. त्यामुळे या युद्धाचा फटका अनेक देशांसह भारताला देखील बसला आहे. भारतातही गॅसची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
हेही वाचा – भारताला मोठा दिलासा! 47 हजार टन एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज गुजरातच्या वडीनार बंदरात दाखल
गॅस तुटवड्यामुळे अक्षय कुमार-ट्विंकल खन्नाने कोणता मार्ग शोधून काढला?
भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सामान्य जनतेसोबत व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर या गॅस तुटवड्याची झळ आता बॉलिवूड सेलेब्रिटींना देखील बसली आहे. यामध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) या दोघांना गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसला आहे. यापार्श्वभूमीवर अक्षय आणि ट्विंकलने एक अनोखी आयडीया शोधून काढली आहे.
नुकतेच गॅस तुटवड्याबाबत अक्षय कुमारने भाष्य केले आहे. तो म्हणाला की, आम्हाला एलपीजी गॅस टंचाईबाबत जास्त माहिती नव्हती. सध्या आमच्या घरी सगळं नीट चालू आहे. मात्र, मी आणि माझी पत्नी ट्विंकलने आमच्या घरी दोन इंडक्शन शेगड्या मागवल्या आहेत, असं अक्षयने सांगितलं.
ट्विकलने घरातील स्वयंपाक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी इंडक्शन शेगड्या मागवत खबरदारी घेतली आहे, अशी माहिती अक्षय कुमारने दिली. गॅस तुडवड्याच्या भितीमुळे सावधगिरी बाळगत आता अक्षय आणि ट्विंकलने इंडक्शन शेगडी मागवत सामान्य जनतेलाही मोठा संदेश त्यांनी दिला आहे. त्यांच्या या अनोख्या कल्पनेचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे.
भारतात सध्या एलपीजी गॅसची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून सरकारने नागरिकांना PNG कडे वळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आता बाजारात इंडक्शन शेगडी, इलेक्ट्रिक कुकर अशा पर्यायी स्वयंपाक साधनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दरम्यान, गॅसच्या तुटवड्यामुळे पुणे, मुंबईसारख्या शहरातील अनेक हॉटेल्सनी वडापाव, भजी, डोसा यांसारख्या पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अंधेरी, दादरसारख्या भागांमधील अनेक हॉटेल्सनी आपले मेनू कमी करण्यास सुरूवात केली आहे. आता काही दिवस लोकांना हॉटेलमध्ये मोजकेच पदार्थ खाता येणार आहेत.
दुसरीकडे गॅसच्या तुटवड्याचा फटका हॉटेल्स, रेस्टॉरंटसह मंत्रालयाही बसला आहे. गॅसच्या कमतरतेमुळे मंत्रालयाचे एक कॅन्टीन बंद ठेवण्यात आले आहे. सिलेंडर मिळत नसल्यामुळे मंत्रालयात दोन-तीन दिवस कॅन्टीन बंद ठेवण्यात येणार आहे. तर ज्या कॅन्टीनला महानगर गॅसची पाईप लाईन आहे ते कॅन्टीन फक्त सुरू राहणार असल्याची माहिची दयानंद शेट्टी यांनी दिली आहे.












