• Home
  • राशी भविष्य
  • संस्कृती
  • Sun Transit 2026: सूर्याचे नक्षत्र परिवर्तन! १८ मार्चपासून ‘या’ ३ राशींचा गोल्डन टाईम सुरू, सगळी स्वप्न होणार पूर्ण
ताज्या बातम्या

Sun Transit 2026: सूर्याचे नक्षत्र परिवर्तन! १८ मार्चपासून ‘या’ ३ राशींचा गोल्डन टाईम सुरू, सगळी स्वप्न होणार पूर्ण

Sun Transit 2026

Sun Nakshatra Transit on 18 March 2026: आता फक्त काहीच तास शिल्लक आहेत. उद्या, १८ मार्चपासून सूर्याचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे. या बदलाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव दिसून येणार असून, चला जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा काळ खास ठरणार आहे

ज्योतिषशास्त्रानुसार, १८ मार्च २०२६ रोजी सूर्य देव (Sun transit) नवं नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या दिवशी सूर्य देव उत्तरा भाद्रपद नक्षत्रात स्थिर होतील, ज्याचा स्वामी ग्रह शनिदेव आहेत. या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे, पण काही राशींवर ( Horoscope) त्याचा विशेष सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. विशेषतः तीन राशींच्या लोकांवर याचा प्रभाव खूप शुभ राहील. या लोकांच्या करिअरमध्ये नवे संधी उघडतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि शिक्षण किंवा कौशल्यविकासाच्या क्षेत्रात प्रगती होईल.

हेही वाचा: Horoscope: 17 मार्च! पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत काय सांगतात ग्रह? वाचा आजचे राशिभविष्य

मिथुन राशी

मिथुन राशी (Gemini) च्या लोकांसाठी हा काळ सकारात्मक बदल आणि संधींचा असेल. कामातील मेहनत यशात बदलेल, घरात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक नात्यात गोडवा येईल, तसेच परदेशात जाण्याची संधी मिळेल. जर तुम्ही व्यवसायात नवीन पाऊल टाकण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशी (Scorpio) च्या लोकांसाठी हा काळ शुभ आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. करिअरमध्ये प्रगती दिसेल, सामाजिक मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शिक्षणात यशस्वी होण्यास उपयुक्त ठरेल. नवीन संकल्पना आणि कामे करण्याची संधी मिळेल, तसेच इच्छित गोष्टी पूर्ण होण्याची शक्यता वाढेल.

वृषभ राशी

वृषभ राशी (Taurus) च्या लोकांसाठी सूर्याचे नक्षत्र परिवर्तन लाभदायी आणि संधी निर्माण करणारे ठरेल. अडथळ्यातील कामे पूर्ण होतील, नवीन योजना राबवता येतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. भाऊ-बहिणींच्या मदतीने नोकरी किंवा व्यवसायात फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या दानशीलतेमुळे समाजात तुमची ओळख वाढेल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts