Deception in the Name of Love : केरला स्टोरी चित्रपटासारखी (The Kerala Story Film) घटना नुकतीच वास्तवात घडलीय.. प्रेमाचा बुरखा फाटला आणि दक्ष वैद्य नावाचा मुलगा इक्बाल शेख (A boy named Daksh Vaidya—Iqbal Sheikh) निघाला.. खरी ओळख लपवून तरुणाने तरुणीला प्रेमाच्या (A Romantic Relationship Under a False Identity) जाळ्यात ओढलं आणि लग्नासाठी तयार केलं.. मात्र लग्नाआधीच ही फसवणूक उघड झाली.. सोलापूरचं नातेपुते गाव. या गावातली २५ वर्षांची तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली, एका प्रायव्हेट कंपनीमध्ये तिला जॉब सुद्धा लागला. पुण्यात काम करत असताना तिची एका मुलासोबत ओळख झाली. या मुलाने त्याची ओळख दक्ष वैद्य या नावाने करुन दिली..
ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, या तरुणीने दक्ष वैद्यबद्दल आपल्या घरी सांगितलं. घरच्यांनी लग्नाला होकार दिला, लग्नाची तयारी सुरु केली, पण या मुलीच्या आईला एका महिलेचा फोन आला.. मुलीची आई त्या महिलेशी बोलली, मुलीच्या काकांनी दक्ष वैद्यच्या गावात जाऊन चौकशी केली आणि हा दक्ष केशव वैद्य प्रत्यक्षात इकबाल शेख निघाला. लग्नाच्या काही दिवसआधी इकबाल शेखचं सत्य समोर आलं आणि या मुलीची, तिच्या कुटुंबायांची फसवणूक टळली.
हेही वाचा – स्वतःला किर्तनकार म्हणवणाऱ्या महाराजाचा मुलीवर बलात्कार, पक्कडीनं दिले चटके
बनावट आधारकार्ड व पॅनकार्डद्वारे तरुणीशी प्रेमसंबंध
जात, धर्म लपवून ठेवून, प्रेमसंबंध तयार करून लग्नासाठी चर्चा करणारा प्रेमवीर अखेर नातेपुते पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदला आहे. नातेपुते पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी मुलीच्या कुटुंबीयांना विश्वासात घेऊन चौकशी करून कारवाई केली. मात्र या घटनेने खळबळ माजली आहे. स्वतःला ‘दक्ष केशव वैद्य’ इक्बालने सांगत बनावट आधारकार्ड व पॅनकार्डद्वारे तरुणीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. लग्नाची तयारी सुरू असतानाच तो तरुण इक्बाल शेख असल्याचे उघड झाले आणि सर्वांनाच धक्का बसला. यात नातेपुते पोलिसांनी सखोल चौकशीअंती त्या तरुणाला ११ मार्च रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे…
बनावट आधार व पॅनकार्ड तयार केले
पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या नातेपुते येथील २५ वर्षीय तरुणीशी इक्बालने स्वतःचे नाव दक्ष केशव वैद्य असे सांगून ओळख वाढवली. त्यासाठी त्याने बनावट आधार व पॅनकार्ड तयार केले. तो स्वतः हिंदू असल्याचे सांगत होता. सप्टेंबर २०२५ मध्ये त्याची पहिल्यांदा पिडित तरुणीशी ओळख झाली. काही दिवसांनी मैत्रीचा हात पुढे केला. त्याचवेळी प्रेमाच्या शपथा घेऊन त्याने तरुणीच्या आई-वडील आणि नातेवाइकांशीही संपर्क ठेवत स्वतःबद्दल खोटी माहिती दिली. तरुणीच्या आईला पुण्यातून एका अज्ञात महिलेचे वारंवार फोन आले. संबंधित व्यक्ती विवाहित असून तो हिंदू नसून मुस्लिम असल्याचे ती महिला सांगत होती. त्याच्यापासून दोन अपत्ये असल्याची माहिती तिने दिली.
पहिल्या पत्नीसोबत आंतरधर्मीय विवाह झाल्याची माहिती समोर
यानंतर कुटुंबीयांना संशय आल्याने त्यांनी चौकशी सुरू केली. तरुणीच्या चुलत्याने उंबरे येथे जाऊन स्थानिक पोलिस पाटील व ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, त्या नावाचे कुटुंब गावात नसल्याचे समजले. कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. ती महिला त्याची पत्नी असून तिच्यासोबत आंतरधर्मीय विवाह झाल्याची माहिती पुढे आली. यानंतर कुटुंबीयांनी नातेपुते पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांनी सखोल तपास करून आरोपीची खरी ओळख उघडकीस आणली. पोलिसांनी १० मार्च रोजी त्याला ताब्यात घेतले. ११ मार्च रोजी माळशिरस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.
वस्तुस्थिती समोर आली अन् पिडिता वडिलांसह पोलिसांत
कोरोनात आई-वडील वारले आहेत. भाऊ मुंबईत नोकरी करतो. गावी सहा एकर बागायती शेती असून स्वतःचं घरही आहे असे त्याने सांगितलं होतं. तो तरुणीकडे लग्नासाठी आग्रह धरत होता. तिच्या कुटुंबीयांनाही तरुणीचा हात मागत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीच्या होकारानंतर तिच्या आई-वडिलांनीही विवाहाची तयारी केली. पण, काही दिवसांनी वस्तुस्थिती समोर आली आणि पिडिता वडिलांसह पोलिसांत पोहोचली. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने पालकांनी आपल्या मुलींच्या संपर्काबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. मोबाईलद्वारे होणाऱ्या ओळखींबाबतही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
स्टोरी चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशी स्टोरी
अगदी केरला स्टोरी चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल अशी ही सोलापूर स्टोरी आहे. मात्र पण विषय लग्नापर्यंत जात होता. तेव्हा या मुलीच्या गोष्टी लक्षात यायला हव्या होत्या आणि वेळीच हे प्रकरण उघड व्हायला पाहिजे होतं. मात्र तसं झालं नाही आणि मॅटर थेट लग्नापर्यंत पोहोचल. आता भलं त्या पहिल्या बोयकाचं जिनं कॉल करून हिला वाचवलं. अन्याथा दोन बायका फजिती ऐका.. अशी अवस्था इथंही झाली असती. एढंच नाही तर लग्नानंतर हा इक्बाल आहे असं उघड झालं असतं, तर पीडितेलाही मानसिक धक्का आणखी मोठा बसला असता… कसंय मंडळी प्रेमाला विरोध नाही, प्रेम हे काही धर्म, जात, पंथ बघून होत नाही, पण प्रेमात सर्वात जास्त मॅटर करतो तो म्हणजे विश्वास… त्याला तडा गेला आणि फसवणूक झाली की ते प्रेम उरत नाही, तिथं… क्राइम स्टोरीची एन्ट्री होते… इथंही तेच झाल्याचं पाहायला मिळालं.






