विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. अशातच पोलिसांकडून गुंडाना गुढघ्यावर बसवून वर्तन काढण्याची पद्धत सुरु असतानाच कुख्यात गुंड निलेश घायवळ हा लंडन येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यात कोथरूड परिसरात गोळीबार झाला होता. या गोळीबारातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड निलेश घायवळ वर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. परंतु, निलेश घायवळ हा पुण्यातून (Pune) लंडनला पळून गेल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. परंतु निलेश घायवळ वर अनेक गुन्हे दाखल असताना देखील त्याला पासपोर्ट मिळाला तरी कसा हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंदवलेले आहे. असे असताना त्याला पासपोर्ट मिळाला तरी कसा असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रश्नावर पोलिसांनी उत्तर दिले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार घायवळ ने त्यांच्याकडे पासपोर्ट जमा केलाच नव्हता असे उत्तर मिळाले आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ यांनी गुन्हेगारी कृत्यातून प्रचंड पैसे कमावला असून लंडन येथे घर घेतल्याची माहिती उघड झाली आहे.
तसेच घायवळ याच्यावर लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.
काय आहे प्रकरण
पुण्यात कोथरूड परिसरात काही दिवसापूर्वी निलेश घायवळ याने गोळीबार केला होता. या प्रकरणामुळे त्याच्यासह 10 जणांवर मकोका कारवाई करण्यात आली होती. याठिकाणी रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या दुचाकीला जाण्यास जागा न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादावादीनंतर तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात प्रकाश मधुकर धुमाळ हा युवक जखमी झाला होता. तसेच या प्रकरणातील आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून आणखी एका इसमाच्या मानेवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत, चदिलकर, फाटक, व्यास यांना अटक करण्यात आली आहे. तर इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.