Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा अडकली लग्नबंधनात; प्रियकरासोबत घेतले सात फेरे
Top News

कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा अडकली लग्नबंधनात; प्रियकरासोबत घेतले सात फेरे

Kumbh Mela Girl Monalisa Marriage | कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल (Kumbh Mela Viral Girl) मोनालिसा भोसले (Monalisa Bhosale) ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आताही ती चांगलीच चर्चेत आली आहे. कारण मोनालिसा लग्नबंधनात (Monalisa Marriage) अडकली आहे. मोनालिसाने तिच्या प्रियकरासोबत लग्न केले आहे. सध्या तिच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – युद्ध थांबवण्यासाठी इराणने घातल्या 3 अटी, डोनाल्ड ट्रम्प काय घेणार भूमिका?

कोण आहे मोनालिसाचा प्रियकर?

मोनालिसाने केरळमधील तिचा प्रियकर फरमान खानसोबत लग्नगाठ बांधली आहे. घरात कुणालाही कल्पना न देता मोनालिसाने प्रियकर फरमान खानसोबत पारंपारिक पद्धतीने मंदिरात जाऊन लग्न केले आहे. मोनालिसा आणि फरमानने तिरूवनंतपुरमधील नैनार मंदिरात जाऊन लग्न केले आहे. यावेळी त्यांचं लग्न पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

मोनालिसाच्या लग्नाला घरच्यांचा विरोध, पोलिसांत केली तक्रार दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसाच्या लग्नाला तिच्या कुटुंबियांचा विरोध होता. लग्नापूर्वी मोनालिसाने तिच्या कुटुंबियांविरोधात केरळच्या थंपनूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तिच्या कुटुंबियांना तिचे आणि फरमानचे नाते मान्य नव्हते, त्यामुळे तिच्या वडीलांनी तिच्या इच्छेविरूद्ध तिला त्यांच्या गावी नेण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार मोनालिसाने दाखल केली होती. तर आता मोनालिसाने घरच्यांच्या विरोधात जाऊन फरमानसोबत लग्नगाठ बांधली आहे.

लग्नानंतर मोनालिसाने आणि फरमानने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मोनालिसा म्हणाली की, लग्नानंतर मी आनंदी आहे. तसेत आता आम्ही केरळला राहणार आहोत. कारण केरळ आमचे आवडते ठिकाण आहे. तर फरमान खान म्हणाला की, आमची प्रेमकथा ही सहा महिन्यांची असून मी देखील एक कलाकार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanush Focuz (@dhanushfocuz)

मोनालिसाला फसवलं जात आहे? दिग्दर्शकाचा आरोप

मोनालिसाच्या लग्नाबाबत तिला चित्रपटात काम देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी गंभीर आरोप केला आहे. हे लव जिहादचं प्रकरण असून मोनालिसाला फसवलं जात आहे, असा आरोप सनोज मिश्रा यांनी केला आहे.

दरम्यान, मोनालिसाच्या लग्नानंतर तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे. तर मोनालिसा ही महाकुंभ मेळा 2025 मधील काही फोटो आणि व्हिडीओंमुळे व्हायरल झाली होती. तिच्या सौदर्याने अनेकांना भूरळ घातली होती. त्यानंतर मोनालिसाला दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती. चित्रपटात काम केल्यानंतर मोनालिसा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts