लातूरच्या अहमदपूरमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयन्त केल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले आहेत. अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकार्यावर कारवाई करा, ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना पिक विमा द्या, या मागन्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
याच पार्श्वभूमीवर अहमदपूर तहसीलदारांच्या दालनात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांनी चक्क फाशी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वेळीच नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टाळला. मात्र अतिवृष्टी आणि पिक विमा, या विषयाला धरून शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. अतिवृष्टीची बोगस यादी बनवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा या मागणीसाठी शेतकरी अहमदपूर तहसील कार्यालयात गेले होते.