Maharashtra liquor ban : सध्या संपूर्ण राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणूका पार पाडण्यासाठी तयारी सुरु आहे. या निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार असून राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. आणि 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर पासून म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशीपासून सलग 3 दिवस ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच आता हे 3 दिवस मद्यपीना मद्य मिळणार नाही.
काय आहे आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्री बंद राहणार आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/ विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री, बार अँड रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिअर शॉपी हे सर्व 1 डिसेंबर 2025 पासून 3 डिसेंबर पर्यंत बंद असणार आहे. याबाबत आदेश पारित करण्यात आले असून मतदानाचे निकल जाहीर झाल्यानंतर मद्य विक्री सुरु करण्यात येणार आहे.
कधी असणार ड्राय डे
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर म्हणजेच मतदान होण्याच्या पहिल्या दिवशी, 2 डिसेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी, 3 डिसेंबर म्हणजे मतमोजणीच्या दिवशी ड्राय दे असणार आहे. त्यानुसार मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
कुठे होणार मतदान
2 डिसेंबर रोजी होणारे मतदान हे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,ठाणे, अहिल्यानगर, धुळे , जळगाव, नशिराबाद, नंदूरबार नाशिक कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा याठिकाणी पार पडणार आहे.












