Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मनीषा कोईरालानं स्वीकारला 55 वर्षांत ‘सॉल्ट-अँड-पेपर’ लूक
Top News

मनीषा कोईरालानं स्वीकारला 55 वर्षांत ‘सॉल्ट-अँड-पेपर’ लूक

Manisha Koirala

Manisha Koirala salt-and-pepper look: बॉलिवूडची 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला, जिचे अनेकांसोबत नाव जोडले गेले, आज पुन्हा चर्चेत आली आहे, पण यावेळी तिच्या नॅचरल ग्रे केसांमुळे. चला तर पाहुयात तिचा नवीन लुक कसा आहे.

बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला पुन्हा चर्चेत आली आहे. पण यावेळी तिच्या नॅचरल ग्रे केसांमुळे. सौंदर्याच्या पारंपरिक चौकटींना फाटकार देत, मनीषा आता तिच्या वाढत्या वयाशी प्रामाणिकपणे समोर येत आहे आणि स्वतःच्या नैसर्गिक रूपात तिचा सॉल्ट-अँड-पेपर’ लूक फ्लॉन्ट करत आहे.

हेही वाचा: दुसऱ्यांदा आई झाली ही अभिनेत्री; सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली गूड न्यूज!

मनीषा नेपाळच्या ज्येष्ठ राजकारणी प्रकाश कोईराला यांची कन्या असून, बॉलिवूडसह दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही तिने आपली छाप सोडली आहे. १९९० च्या दशकात हिंदी चित्रपटांसह तमिळ सिनेमा गाजवणाऱ्या मनीषाला तिच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय, उच्च मानधन घेणाऱ्या आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानले जात असे.

https://www.instagram.com/p/DWK7r2biIDp/?utm_source=ig_embed&ig_rid=5c2ff279-9047-4daf-b561-dab7749d1137&img_index=1

 नो-मेकअप लूक

अलीकडे मनिषाने ईदच्या निमित्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये नो-मेकअप लूक आणि साधा नॅचरल अंदाज पाहायला मिळालं. तिनं म्हटले, ” काही दिवस असताना जेव्हा चमकण्यासाठी कोणत्याही खास कारणाची गरज नसते. फक्त आनंदी मन आणि साधेपणा पुरेसे असतात.”

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढताना

मनीषा केवळ सौंदर्याच्या प्रतीक म्हणून ओळखली जात नाही, तर तिच्या जीवनातील संघर्ष आणि मजबूत व्यक्तिमत्त्वामुळेही ती प्रेरणादायी ठरते. 2012 मध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढताना, तिने आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तिच्या मते, खरी सुंदरता म्हणजे फक्त चेहरा नाही; ती जीवनातील अनुभव, संघर्ष आणि स्वतःला स्वीकारण्याची ताकद आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts